उस्मानाबाद  -:  जिल्हा उद्योग केंद्र,उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित सर्वसाधारण घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी मोफत पशुपालन व दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण दि.10 जून ते 9 जून,2014 या कालावधीत  येडशी ता.जि.उस्मानाबाद येथे आयोजित केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण पशुपालन व दुग्धव्यवसाय व्यवस्थापन तसेच उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज 12 ते 5 या वेळेत तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक व वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे माहिती दिली जाणार आहे.
        तरी इच्छूक युवक व युवतींनी प्रवेश अर्ज भरणेसाठी व अधिक माहितीसाठी 8 जून,2014 पर्यंत संपर्क साधावा. तसेच 9 जून रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक श्री.सस्ते महादेव  ग्रामपंचायत, येडशी भ्रमणध्वनी क्र. 8275272895/9420201195 यांच्याशी संपर्क साधावा,असे एम.सी.ई.डी चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे                      
 
Top