उस्मानाबाद :- येत्या 11 मे रोजी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीसी) 2013-2014 इयत्ता 10 वीसाठी राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेच्या उत्तर पत्रिकेचे मुल्यांकन करताना वजा गुण निगेटीव्ह मार्कींग पध्दतीचा अवलंब केला जाईल,असे कळविण्यात आले होते.
सर्वसामान्य बुध्दीमत्ता चाचणी, शालेय क्षमता चाचणी आणि भाषीक क्षमता या तीनही पेपरच्या उत्तरपत्रिकांचे गुणांकन वजा गुण निगेटीव्ह मार्कीग पध्दतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा करण्यात येईल. तसेच ज्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी नोंदवलेले नाहीत, अशा प्रश्नासाठी गुण वजा करण्यात येणार असल्याची माहिती वैजिनाथ खांडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी दिली आहे.