उस्मानाबाद :- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही शासनाची महत्वकांक्षी योजना असून जिल्ह्यातील सर्व जनतेला याचा लाभ मिळण्यासाठी व याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या पुढाकारातून आचारसंहिता संपताच विशेष कॅम्प घेऊन जनतेला त्यांच्या आरोग्याच्या हिताचे आरोग्य कार्ड मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद सदसय, पंचायत समिती सभापती , गटविकास अधिकारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी हे आवाहन केले.
अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ. तानाजी माने, जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. कुलदीप शिरपूरकर, एनआरएचएमचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.गाडेकर, नगर प्रशासन विभागाचे प्रकल्प समन्वयक कूरवलकर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
या योजनेच्या कार्डचे वाटप गावातील गरीब जनतेला झाल्यासच त्याचा खरा फायदा होईल. ही योजना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. शासकीय योजनांची माहिती आपल्या मतदारसंघात होण्यासाठी प्रभागनिहाय कॅम्पचेही आयोजन करण्यात यावे. विशेष कॅम्पचे आराखडा 16 मे नंतर करण्यात यावे,अशाही सूचना देऊन डॉ. नारनवरे पूढे म्हणाले की, अशा शासकीय कामामुळे लोकांमध्ये एक प्रकारची चेतना जागृत होईल होऊन त्यांच्यामध्ये सर्वांबद्दल आपूलकी निर्माण होईल. राजीव गांधी जीवनदायी कार्डचे वाटप करतांनाच रेशनकार्ड, पुरवठा विभागाचे तसेच शासकीय योजना एकच दिवशी कॅम्पचेही आयोजन करता येईल, असेही त्यांनी यावेळी कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी राजीव गांधी जीवनदायी योजना किती फायदेशीर असून त्यांचा लाभ जिल्ह्यात जनतेला होईल. या योजनेची सर्वांना गरज असून या महत्वकांक्षी योजनेत 271 रोगांचे निदान व उपायांचा समावेश होणार आहे. गोरगरीब जनतेला लाभ देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना केंद्र शासनाने सुरु केली असून सर्वांना याची माहिती व्हावी व त्यांनी याचा लाभ घ्यावा हा मुख्य उद्देश आहे. शतकोटी वृक्ष लागवडीचे 8 तालुक्यांना उदिष्ट दिले असून ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे सांगितले.
उपजिल्हाधिकारी तांबे यांनी यावेळी कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्यात कशा प्रकारे राबविली जाते. त्यामुळे मजूरांना शासनामार्फत कृषी, पशुधन,जलसिंचन,तलावातील गाळ काढणे,शौचालये, दुष्काळ प्रतिबंधात्मक काम या विषयक योजना राबवून मजूरांना रोजगार उपलबध करुन दिला जातो. रोहयो मार्फत विविध कामे सुरु असून त्यांनी करावयाची कामे याबाबतची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. यावेळी डॉ. माने यांनी आभार मानले.