बार्शी -: शिवसेना नेते राजेंद्र मिरगणे यांच्या वाढदिवसानिमित्त जयसेवालाल गु्रपच्या वतीने ग्रामीण भागातील क्रिडाप्रेमींसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भातंबरे (ता.बार्शी) येथील येमाई लमान तांडा येथे या स्पर्धा दि.१० मे पासून सुरु होत आहेत. या स्पर्धेसाठी रु. ५०१/- प्रवेश शुल्क आकारण्यात येत असून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रुपये अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ दि मॅच, सलग तीन षटकार, सलग चार चौकार, सलग तीन विकेट, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट संघ, उत्कृष्ट फलंदाज, जलद गोलंदाज आदी वैयक्तिक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. हे सामने बाद पध्दतीने, दहा षटकांचे होत आहेत. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लिंबाजी जाधव मो. ९१५८४२११७३, नेताजी राठोड मो. ७७७३९८५३५९, प्रविण राठोड मो.८३०८८७८५४६, अनिल राठोड मो. ८३९०५५०६१० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.