या स्पर्धेसाठी सांगलीचे आमदार संभाजी पवार, नामदेव वाघमारे, नारायण पाटील, धनंजय डिकुळे, छोटा रावसाहेब मगर, तानाजी बनकर, अर्जुनवीर पुरस्कारविजेते काका पवार, विश्वास हरगुले यासह कुस्तीतील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खुला गट, ८६ , ७६ , ६६ , ५६, ४६ किलो अशा वजनी गटांमध्ये घेण्यात येत आहे. खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी सव्वा किलो चांदीची गदा व रोख ७५ हजारांचे पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी अर्धा किलो चांदीचे कंकण व ५१ हजारांचे रोख पारितोषिक, तृतीय क्रमांकासाठी अडीचशे ग्राम चांदीचे कंकण व रोख ३१ हजार रुपये. ८६ किलो गटातील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ४१, ३१ व २१ हजार रोख व स्मृतीचिन्ह, ७६ किलो गटातील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ३१, २१ व १५ हजार रोख व स्मृतीचिन्ह, ६६ किलो गटातील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५, १५ व ११ हजार रोख व स्मृतीचिन्ह, ५६ किलो गटातील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २१, ११ व ९ हजार रोख व स्मृतीचिन्ह, ४६ किलो गटातील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ११, ७ व ५ हजार रोख व स्मृतीचिन्ह अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणार्या मल्लांची निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. खुल्या गटातील मल्लांचे प्रवास भाडे देण्यात येणार आहे. प्रत्येक कुस्ती २५ मिनीटांची व त्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार निकाल देण्यात येईल. या स्पर्धेचे समालोचन करण्यासाठी शंकर पुजारी, कोथळीकर, राजाभाऊ देवकते, हलगीवादन करण्यासाठी राजू आवाळे हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी काका पवार ९८५०५७८७५९, मदन (टिंकू) गव्हाणे ९८२२०७१४१९, ७५०७७७८३७० या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेचे पंच म्हणून रावसाहेब मगर, आस्लम काझी, भरत मेकाले, बिभिषण पाटील, रामभाऊ बेणे, नवनाथ जगताप, आबाजी पवार, मदन (टिंकू) गव्हाणे, दिनेश गवळी, बाळासाहेब गव्हाणे, अरुण कंडरे, सचिन धस, गणेश डमरे, भाऊ कोळी, बालाजी भोकरे, भारत भोसले, प्रमोद माळी, दिपक चव्हाण, विलास थिरवे, धनराज भुजबळ, जयपाल राऊत, पंजाब घाडगे, सुरेश गव्हाणे, ज्ञानदेव लाखंडे, ठवरे पाटील, झुंजार सोलनकर, दिनेश अनपट, नेताजी गव्हाणे, रमेश गुंड, अरुण सांगोळे, राजाभाऊ घोलप आदी उपस्थित राहणार आहेत.