बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीत आयोजित करण्यात आलेल्या नाट्यप्रशिक्षण शिबिरात मुलांना नाट्यवाचनाचे धडे यासह मुक अभियनय व संहिता लेखनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
जिजामाता विद्यामंदीर येथे दि. 3 मे पासून या शिबीराची सुरुवात करण्यात आली आहे. दि. 12 मे पर्यंत हे शिबीर घेण्यात येत असून अनेक वर्षाच्या कालावधीनंतर हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या चांगल्या प्रोत्साहनामुळे यश मिळाले असल्याने पुढील वर्षी ते व्यापक स्वरुपात होईल, असे संयोजकांनी सांगितले.
एकांकिका व नाटकाचे दिग्दर्शक अमर देवकर हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद बार्शी शाखेच्यावतीने हे शिबीर घेण्यात आले आहे. पा.नं. निपाणीकर, कवी रामचंद्र इकारे, सचिन वायकुळे व कविता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचा चार दिवसांचा काळ, नाटकांतील अनेक पैलू उलगडत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारा ठरला आहे. या शिबीरातून एक दिवस यशवंतराव चव्हाण सभागृहातील रंगमंचावर पार पडणार आहे. अंतिम टप्प्यात सहभागी विद्यार्थ्यांकडुन नाटक, एकांकितेतील काही प्रसंगाचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. नाट्यप्रशिक्षणाच्या या प्रयोगाचे अनेक पालकांकडून तसेच रंगकर्मीकडून स्वागत करण्यात आले आहे. हौशी कलावंत म्हणून तीस वर्षापूर्वी रंगमंच गाजविणारे नाट्यकलावंत विश्वासराव शेटे यांनी शिबीराला भेट देऊन मार्गदर्शन केले.