बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विजय मोहन खिलारे हे नुकत्याच झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
ऑक्टोबरमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, या परीक्षेत सुमारे 36 हजार परीक्षार्थींनी सहभाग नोंदविला. 164 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नाच गुणवत्ता यादीत 79 व्या क्रमांक मिळवून खिलारे यांची एकमेव निवड झाली आहे.
नोकरी करत असताना मिळालेल्या वेळेत सतत अभ्यास करुन आणखी चांगले काम करण्याची संधी त्यांनी प्राप्त केली आहे व तरुण सहका-यांना यातून चांगला आदर्श उभा केला आहे. मुळचे लोणारवाडी (ता. पंढरपूर) येथील खिलारे हे 2006 मध्ये पोलीस सेवेत भरती झाले आहेत. मोहोळ व बार्शी येथे त्यांनी आजपर्यंत काम केले आहे. जूनपासून पुढील प्रशिक्षणासाठी नाशिक अथवा तासगाव येथे रवाना करण्यात येईल.