ताब्यात घेतलेल्या वाहनांत पाकीजा बँडचा एम.एच.१२ यू.ए. ७४८९, दरबार बँडच्या एम.एच.४५ २१७६, राजकमल बँडच्या ए.सी.डीजे. एम.एच.१० के ६६२३, एम.एच.२२ बी.७९५७, एम.एच.१३ आर १३७८, कलीम पिंजारी विजय बँडचा एम.एच.१६ सी ७२३६, साईराज बँडचे एमकेजे २३५६, एमएच २३ सी ७५०, राजश्री डिजे एम एच ११ एफ, अमोल सरवदे एसीडीजे यासह मोठ्या ध्वनीक्षेपकांचा वापर करणारी वाहने ताब्यात घेली आहेत. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
एका कार्यक्रमासाठी वीस हजारापासून दिड लाखांपर्यंत वेगवेगळ्या सुपार्या घेणारे बार्शीतील काही व्यवसायीक आहेत, तसेच बाहेरगावहून व्यवसायासाठी येणारेही मोठे व्यावसायीक आहेत. विविध कार्यक्रमासाठी काम करणार्या बँड व्यावसायीकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्याने व्यापार्यांना व नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ध्वनीची मर्यादा तपासण्याचे यंत्र बार्शी पोलिसांकडे उपलब्ध आहे परंतु अद्याप त्याचा वापर झाला नसल्याचे दैनंदिन कार्यक्रमावरुन दिसून येते. इमानदारीने काम करणारे अधिकारी म्हणून सोलापूरच्या चंद्रकांत गुडेवार यांना तेथील नागरिकांनी डोक्यावर घेतले आहे, त्यांचा आदर्श घेऊन विविध पोलिस अधिकार्यांनी काम केल्यास त्यांनाही नागरिक डोक्यावर घेतील परंतु केवळ कारवाईचा फार्स झाला अन नुसती मोजणी झाली तर नागरिकांचा विश्वासघात होईल अशी चर्चा सामान्य नागरिक करतांना दिसून येत होते.