उस्मानाबाद  :- जिल्हा नियोजनासाठीचा निधी विविध  यंत्रणांनी वेळेत खर्च करावा त्यासाठीचे तपशीलवार नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. नारनवरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी  जे. टी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे आदींची यावेळी उपस्थिती होती.
     यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण तसेच विशेष घटक योजनेतील खर्चाचा यंत्रणानिहाय आढावा घेतला. गाभा व बिगर गाभा क्षेत्रातील यंत्रणांचा योजनानिहाय खर्च, अखर्चित रक्कम आदींबाबत त्यांनी  संबधितांना उर्वरित कार्यवाही तात्काळ करावयास सांगितले.
निधी अखर्चित राहिला तर राज्य समितीकडून जिल्हयासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये कपात होवू शकते, त्यामुळे प्रत्येक यंत्रणांनी त्यांना वितरित करण्यात आलेला निधी शंभर टक्के उपयोगात येईल, याबाबत दक्षता घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
वार्षिक योजना 2014-15 मध्ये प्रत्येक यंत्रणांनी त्यांच्या योजनांसाठी प्रशासकीय मान्यता वेळेवर प्रापत करुन घ्याव्यात. त्यासाठी लागणारी तांत्रिक मान्यता व अनुषंगीक बाबींची पूर्तता करण्यास प्राधान्या दयावे, असे यावेळी श्री. भांगे यांनी सांगितले.
 
Top