बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: राज्यभरातील पोलिस दलाच्या अतिरिक्त पदनिर्मितीस मिळालेल्या मंजूरीनुसार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर पोलि ठाण्याचे विभाजन करुन नवीन पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे तसेच बार्शी तालुक्यातील वैराग, पांगरी पोलिस ठाण्याचे विभाजन, नवीन बार्शी तालुका पोलिस ठाण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासह नक्षलविरोधी कक्ष, दहशतवाद विरोधी कक्ष, आंतरिक सुरक्षा कक्ष, वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेल अशा एकूण १८४ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संख्येस मंजूरी देण्यात आली आहे.
        महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून ४ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्य पोलिस दलासाठी प्रत्येक टप्प्यात ११०२१ प्रमाणे पाच टप्पात पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. न्यानुसार बृहन्मुंबई करिता १०४४३ व उर्वरित महाराष्ट्रासाठी ४४६६२ अशी विविध संवर्गातून ५५१०५ पदे लोकसंख्येनुसार निर्माण करण्यात आली आहेत. सन १०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११,२३,७३,९७२ इतकी झाली आहे. राज्य पोलिस दलात मंजूर असलेल्या मनुष्यबळात २,०८,४५४ एवढी संख्या असून यामध्ये गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्रशिक्षण, राज्य राखीव पोलिस दल, फोर्स वन, दहशतवाद विरोधी पथक इत्यादींसारख्या विशेष अंतर्भूत शाखा कार्यान्वित आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्‍नासाठी पोलिस आयुक्तालये व जिल्हा पोलिस घटकातील मंजूर मनुष्यबळ १,८१,४३९ इतके आहे. त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात ६१९ लोकसंख्येमागे १ पोलिस असे प्रमाण येते. मुंबई शहर आंतरराष्ट्रीय स्तराचे शहर असल्याने त्या ठिकाणी १०० ते १५० लोकसंख्येमागे १ पोलिस असे आदर्श प्रमाण आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात विविध घटकांसाठी १,२२,७८८ मनुष्यबळांची आवश्यकता आहे. एकाच वेळी वाढविणे शक्य नसल्याने पाच टप्प्यात किमान ५० टक्के मनुष्यबळ वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधिन होता त्यातील पहिल्या टप्प्यास मंजूरी देण्यात आली आहे. ५० टक्क्याप्रमाणे ६१,४९४ नवीन पदे पाच वर्षात निर्माण करण्यात येतील त्यापैकी पहिल्या टप्प्यात मुंबई करिता नवीन ६४ पोलिस ठाणी व विविध घटकांसाठी १०८७९ नवीन पदांना मंजूरी देण्यात आली आहे. राज्यातील विविध भागात ६३ नवीन पोलिस ठाणी व विविध संवर्गातील १०४४३ पदे निर्माण व त्यानुसार साधनसामुग्री, फर्निचर, शस्त्र, दारुगोळा इत्यादीस मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी नव्याने मंजूर केलेल्या पोलिस कर्मचार्‍यांमध्ये नवीन पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यासाठी पोलिस निरीक्षक १, सहाय्यक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक ३, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ९, पोलिस हवालदार १५, पोलिस नाईक १५, पोलिस शिपाई १९ असे ६३ कर्मचारी, नवीन बार्शी तालुका पोलिस ठाण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक २, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ९, पोलिस हवालदार १६, पोलिस नाईक १६, पोलिस शिपाई २१ असे ६५ कर्मचारी, नक्षलविरोधी कक्षासाठी पोलिस हवालदार १, पोलिस नाईक १, पोलिस शिपाई १ असे ३ कर्मचारी, दहशतवाद विरोधी कक्षासाठी पोलिस उपनिरीक्षक १, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक १, पोलिस हवालदार १, पोलिस नाईक १, पोलिस शिपाई २ असे ६ कर्मचारी, आंतरिक सुरक्षा कक्षासाठी पोलिस उपनिरीक्षक १, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक १, पोलिस हवालदार १, पोलिस नाईक १, पोलिस शिपाई १ असे ५ कर्मचारी, वाहतुक शाखेसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक २, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ३, पोलिस हवालदार ५, पोलिस नाईक ५, पोलिस शिपाई ९ असे २५ कर्मचारी, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेल करिता पोलिस निरीक्षक १, सहाय्यक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक २, पोलिस हवालदार ३, पोलिस नाईक ३, पोलिस शिपाई ५, असे १७ कर्मचारी यांना मान्यता देण्यात आली आहे. नव्याने होणार्‍या ठाण्यांसाठी व कर्मचार्‍यांसाठी लागणार्‍या साहित्यांसाठी अधिकारी खुर्ची, अधिकारी टेबल, ऑफिस खुर्ची, ऑफिस टेबल, अभ्यगतासाठी खुर्ची, लॉकर शिवाय व लॉकरसह ऑफिस कपाट, जीप वाहन, दूरध्वनी, लाईट व्हॅन, बस ट्युब करीअर, बिर्नींारी संच, संगणक सामग्री, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, गन कार्बनएसएन, ९३३ पिस्तूल, रायफल ७.६२ एसएलआर, ट्रक, मोटर सायकल, बारा बोर गन, आकस्किम र्खा, पोलिस ठाणे भाडे खर्च इत्यादी आवश्यक खर्चांना मान्यता देण्यात आली आहे.
 
Top