कळंब -:कळंब शहरा लगतच्या द्वारका नगरी येथील नवनाथ गव्हाने यांच्या घरातील महिलाला चाकुचा धाक दाखवुन 10 तोळे सोने व 20 हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. सदरील घटना गुरुवारी पहाटे पूर्वी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे, चोरट्यानी एकूण 2,76000 रूपयेचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी नवनाथ भगवंतराव गव्हाणे वय 58 वर्ष यांच्या फिर्यादी वरून गु.र.नं.59/2014 भादंवि कलम 392 नुसार कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.नि.चंद्रकात सावळे हे करत आहेत.