उस्मानाबाद :- सोबाबीन बियाण्याची उगवण शक्ती तपासण्यापूर्वी सोयाबीन बियाणे चाळणी करुन स्वच्छ करावीत. त्यातील काडी, कचरा, फुटलेले/ भेगा पडलेले बियाणे काढून टाकावे व शेवटी पेरणीस योग्य बियाण्याची उगवण शक्ती तपासावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
उगवण शक्ती तपासण्यासाठी वर्तमानपत्राचे 6 पाने एकत्रित घेवून त्याच्या साधारणत : 3 सें. मी. रुंदीच्या 10 घडया घालून तो गुंडाळा पाण्यात बुडवून काढा. नंतर पाणी पुर्णपणे निथळू दया व तो कागद जमीनीवर अंथरुण प्रत्येक घडीमध्ये 10 दाणे ठेवा. एकानंतर एक घडीमध्ये दाणे ठेवल्यानंतर तो गुंडाळा एका प्लॉस्टिकच्या तुकड्यात गुंडाळून घरातच सावलीत ठेवा. 4 दिवसानंतर प्लॅस्टिक काढून गुंडाळा सावकाश उकला, मोड आलेल्या सशक्त रोपांची संख्या मोजा, उगवण शक्तीचे प्रमाण शेकडा किती आहे समजेल. अशाच प्रकारे 100 दाणे गोणपाटात किंवा कुंडीत मातीत टाकून देखील उगवण शक्ती तपासता येते.
दुसऱ्या पध्दतीमध्ये 100 सोयाबीन बियाणे 5 ते 10 मिनीटे पाण्यात भिजवावे ते बाहेर काढल्यानंतर त्या बियाणाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. ज्या बियाणावर सुरकुत्या पडल्या असतील ते बियाणे उगवणक्षम आहे, असे समजावे. अशाची संख्या 70 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर ते बियाणे पेरणीस योग्य समजावे. बियाणाच्या तपासणीअंती उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास जेवढ्या प्रमाणात उगवण शक्ती कमी आहे तेवढ्या प्रमाणात दर हेक्टरी जास्तीचे बियाणे पेरणी करीता वापरावे.
बियाणे उगवण शक्ती तपासणीसाठी वापरावयाचे वर्तमानपत्र, गोणपाट, माती, पाणी हे स्वच्छ व निर्जंतुक असावे अथवा बियाणावर बुरशीची वाढ होवून उगवण शक्यती कमी हेाते.
सोयाबीन बियाणे वापरताना बिज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रथम थायरम व बुरशीनाशकाची प्रती किलो 3 ग्रॅम याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी व त्यानंतर ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची प्रति किलो 4 ग्रॅम प्रमाणे बिज प्रक्रिया करावी व बियाणे सावलीत सुकू दयावे.
तदनंतर त्या बियाण्यास रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येक 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यास लावावे. बाजारात द्रवरुपी रायझोबियम व स्फूरद विरघळणारे जीवाणू देखील उपलब्ध असून सदरील द्रवरुपी जीवाणू संवर्धकाचा प्रत्येकी 6 मिली प्रति किलो वापर करावा. वरीलप्रमाणे घरगुती बियाणे उगवण शक्ती तपासून व बिज प्रक्रिया करुन सोयाबीन बियाणे कमतरतेवर मात करावी व सोयाबीन खरीप हंगाम यशस्वी करावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.