बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- इंडियन रेड क्रॉस सोसायटी, राज्य शाखा मुंबई च्यावतीने बार्शी रेड क्रॉस येथे भरविण्यात आलेल्या ३ दिवसीय प्रथोमपचार शिबीरामध्ये सहभाग घेतलेल्या ३५ प्रशिक्षणार्थीना बार्शी रेड क्रॉस चे उपाध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव व उद्योगपती प्रितेश मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी उद्योगपती गौतम कांकरिया उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ सह सचिव सुभाष जवळेकर प्रा.दिलीप कराड,कल्याण घळके,अशोक ढाळे प्रतापराव जगदाळे मुंबई वरुन खास प्रशिक्षण देण्यासाठी आलेले .भरत जोईल व डॉ.विकास कुरणे आदि उपस्थित होते.
    या वेळी डॉ.यादव म्हणाले की एखादी दूर्घटना घडल्यानंतर जखमीना लगेचच प्रथोमचार न मिळाल्याने अनेक जखमीना आपला जीव व अवयव गमवावा लागतो.. त्यासाठी त्यांना अपघाताच्या ठिकाणी प्रथमोपचाराची गरज असते.अशा वेळी त्या ठिकाणी प्रथोमपचार प्रशिक्षक असतील तर कमी नुकसान होते. भविष्यात अशा प्रकारच्या शिबीराची आवश्यकता असून यात मोठ्या प्रमाणात प्रथोमपचार प्रशिक्षक तयार होण्याची गरज आहे.या पूढील काळात आपल्या समोर एखादी दूर्घटना घडल्यास आपल्यातील माणूसपण जागे होऊन आणि प्रशिक्षणाच्या जोरावर योग्य तो प्रथोमचार मिळाल्याने जखमीचा जीव वाचल्याने आपल्या चेहर्‍यावर एक वेगळेच आनंद मिळतो. असे सांगत रेड क्रॉस च्या वतीने शहरात व ग्रामीण भागात देखील अनेक प्रथोपचार शिबीरे घेण्याचा मानस आहे.
    या शिबीरामध्ये प्रशिक्षणार्थींचे लेखी,तोंडी व प्रात्यक्षिक अशी परीक्षा घेतली गेली.याचा निकालावर दिल्ली मुख्यालाय यांच्या संपूर्ण अहवाल पाठवून त्या मध्ये यशस्वी प्रशिक्षणार्थीना प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
    या वेळी प्रितेश मेहता यांनी आपल्या ३९ व्या वाढदिवसानिमीत्त गरजू रुग्णांना ३९ रक्ताच्या पिशव्या मोफत देण्याची तसेच रुपये २७ हजारांची देणगी देण्याची घोषणा त्यानी केली. तसेच या प्रसंगी प्रशिक्षणार्थी मधूनही स्नेहल कुंकूलोळ,अश्‍विनी गुंड,दिपक डमरे व पूजा कुंकूलोळ यांनी या शिबीरातील अनुभव सांगत आपले मनोगत व्यक्त केले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित कुंकूलोळ यांनी केले तर आभार डॉ.भरत गायकवाड यानी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बुडूख,रुपाली सूत्रे, आदिनी परिश्रम घेतले.
 
Top