पांगरी (गणेश गोडसे) -: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पैसै न दिल्याचा राग मनात धरून गाव कामगार तलाठयाने नुकसानग्रस्त शेतक-यांची क्षेत्रे कमी लावुन मुळ पिकांच्या जागेवर इतर पिके लावुन शेतक-यांचे आर्थिक नुकसान केल्याची घटना झानपुर (ता. बार्शी) येथे घडली असुन याबाबत तात्काळ कार्यवाही करून फेरपंचनामे करून नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपार्इ उपलब्ध करून दयावी अन्यथा आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा झानपुर येथील शेतक-यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
      जिल्हाधिका-यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात या भागात तुफान गारपीठ झाली होती. गारपीठीत द्राक्ष, लिंबु, मोसंबी यासह ज्वारी, गहु, हरभरा, कांदा या रब्बीतील प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले हाते. शासनाच्या आदेशानुसार झानपुर येथील पंचनामे घारी येथील गाव कामगार तलाठी रणजीत पानगांवकर यांच्याकडे सोपवण्यात आलेले होते. मात्र संबंधीत तलाठयांनी कोणाच्याही शेतावर न जाता एका जागेवर बसुन पंचनामे केले. शेतक-यांनी प्रत्यक्ष शेतातवर जावुन पंचनामे करा अशी म़ागणी केल्यावर आमच्याकडे तेवढा वेळ नाही व आम्हाला भरपुर कामे असतात अशी उडवा उडवीची उत्तरे दिली होती. त्यानंतर शेतक-यांनी तलाठी जेथे बसलेले होते तेथे जाऊन गारपीठीचा अचुक फॉर्म भरून दिला होता. मात्र त्यावेळेस संबंधीत तलाठयाने शेतक-यांकडुन ध्वजनिधी व 7.12 व 8 अ जोडण्यासाठी 100 रूपयांपासुन 500 रूपयांपर्यंत मागणी केली होती. घडला प्रकार पांगरीचे मंडल अधिकारी एस.व्ही.बदे यांच्या कानावर शेतक-यांनी घातला होता व त्यांनी असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र याचा राग मनात धरून तलाठयांनी संपुर्ण झानपुर गावच्या शेतक-यांची क्षेत्रे कमी लावली व ज्यांच्या बागा होत्या त्या ठिकाणी केळी, भेंडी, पपर्इ अशी साधी पिके लावुन नुकसानग्रस्त बागायतदारांचे नुकसान केले असुन याचा विचार करून या भागातील नुकसानीचे पुन्हा फेरपंचनामे करून त्याच्या 7.12 उता-यांवर असलेल्या पिकांप्रमाणे मदत मिळवुन दयावी. याची दखल न घेतल्यास सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पालकमंत्री, तहसिलदार, पांगरी पोलिस ठाणे, मंडल अधिकारी व संबंधितांना दिल्या आहेत. निवेदनावर लक्ष्मण बनसोडे, विश्वनाथ जाधव, अजिम पठाण, अमोल कारंडे, वसिम पठाण आदी शेतक-यांच्या सहया आहेत.
 
Top