पांगरी (गणेश गोडसे) -: मार्च महिन्यात झालेल्या गारपीठीचे अनुदान वाटपाचे काम सुरू असुन नुकसानग्रस्त अनक शेतक-यांची नावे यादीतुनच गायब असल्याची धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या असुन वगळण्यात आलेल्या शेतक-यांमधुन प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली जात असुन याची दखल घेऊन वरीष्ठांनी वंचित शेतक-यांना नुकसान भरपार्इ मिळवुन देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पांगरी, कारी, पांढरी आदी गावांमधील शेतक-यांनी प्रशासनाला दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांगरी (ता. बार्शी) परिसरासह बार्शी तालुक्यात 25 मार्चच्या दरम्यान तुफान अवकाळी गारपीठ व पाऊस होऊन द्राक्ष बागायतदारांसह शेतकरी व सर्वसामान्यांचे अपरिमित नुकसान झाले होते. मार्चमध्ये सुरू झालेली अवकाळी पावसाची मालिका अजुनही टिकुन आहे. मार्च महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या व गारपीठीचे प्रशासनाने पंचनामे करून तसा अहवाल शासनाला सादर केला होता. तीन महिन्यानंतर त्या नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारी नुकसानीच्या अनुदानाचे वाटप विविध बँकेत करण्यास सुरूवात झालेली आहे. कांही अल्पभुधारक शेतक-यांनी खात्यावर जमा झालेले अनुदान उचलुन कारणीही लावले आहे. मात्र बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावातील असंख्य शेतकरी या अनुदानाच्या यादीतच नसल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय का असे त्या शेतक-यांमधुन बोलले जात आहे. प्रसंगी अनुदानापासुन वंचित असलेल्या शेतक-यात व बँक कर्मचा-यांमध्ये अनुदानावरून चांगलेच खटके ऊडु लागले असुन ही प्रकरणे सरळ पोलिसापर्यंत जाऊ लागली आहेत.
पांगरीसह कारी, पांढरी, झानपुर, ममदापुर, गोरमाळे, घोळवेवाडी, ढेंबरेवाडी, उक्कडगांव, शिराळे, पाथरी, चारे, धानोरे, आगळगांव आदी अनेक गावातील हजारो शेतकरी शासनाच्या गारपीठीच्या अनुदानापासुन वंचित राहीले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासुन वंचित राहील्यामुळे विविध संघटनाही या प्रश्नावर आवाज उठवुन प्रशासनाला जागे करू लागल्या आहेत. मात्र डोळयावर पटी बांधलेल्या प्रशासनाला या शेतक-यांच्या प्रश्नाची जाणीव होणार का? असा प्रश्न आहे.
वरिष्ठ प्रशासन व शासनाने नुकसानग्रस्त कोणीही अनुदानापासुन वंचित रहाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाने हरताळ पुसला असल्याचेच उघड होत आहे.
अनुदानापासुन वंचित राहीलेल्या कारी व परिसरातील शेतक-यांनी बार्शी येथील तहसिल कार्यालयात जावुन याबाबत माहिती दिली असता संबंधीत गावच्या तलाठयांना भेटुन पंचनाम्यासंदर्भात प्रकिया पुर्ण करूण घ्यावी, असे सांगितले असल्याचे समजते. तीन महिन्यांपुर्वी झालेल्या गारपीठीचे अनुदान आता वाटप करण्यात येऊ लागले असुन वंचित शेतक-यांना याची भरपार्इ मिळणार का? हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. नुकसानीच्या अनुदानापासुन वंचित राहीलेल्या शेतक-यांचे फेरपंचनामे करायचे म्हटले तर आता घटनास्थळावर कांहीच पहावयास मिळणार नाही. तरी यासंदर्भात सकारात्मक निर्णय हार्इल, अशी आशा वंचित शेतक-यांना आहे.
यासंदर्भात पांगरीचे मंडल अधिकारी एस.व्ही.बदे व गाव कामगार तलाठी के.बी.राठोड यांच्याकडुन माहिती घेतली असता, पंचनामे करण्यासंदर्भात आम्हाला अदयापपर्यंत तर कोणतेच अधिकृत आदेश देण्यात आलेले नाहीत, असे त्यांनी भ्रमनध्वनीवर बोलताना सांगितले. पंचनाम्याचे आदेशाबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असल्यामुळे वंचित शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पांगरीचे मंडल कृषी अधिकारी नकाते यांच्याकडुन यासंदर्भात माहिती घेतली असता, अवकाळीच्या नुकसान भरपार्इच्या पंचनामे करतेवेळी जे शेतकरी उपस्थित राहीलेले नाहित त्यांची नांवे अनुदानाच्या यादीत येऊ न शकल्यामुळे तसेच शेतकरी अनुदानापासुन वंचित राहिले आहेत. आम्हाला वरिष्ठांचे आदेश झाल्यास तात्काळ पंचनामे करून शासनाला सादर करू असेही ते म्हणाले.