बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील सामान्य रुग्णांना किमान दरात रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जगदाळेमामा हॉस्पिटल प्रसिध्द आहे. येथील उपचार घेणार्या रुग्णांच्या खोलीत येऊन आपण लॅबोरेटरीमधील प्रशिक्षीत कर्मचारी असल्याचे भासवून पैशांची मागणी करणार्या तोतया कर्मचार्यास रुग्णांनी रंगेहाथ पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिले.
सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून यावेळी सेवेत हजर महिला कर्मचार्यांनी त्यास विचारपूस केली असतां उडवाउडवीची उत्तरे दिली व दमदाटी करण्याचा प्रकार घडल्याची माहिती त्या कर्मचार्यांनी हॉस्पिटलमधील संबंधीत अधिकार्यांना दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संस्थाअध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव यांनी या प्रकाराची चौकशी करण्यास बार्शी पोलिसांना कळविले.
बार्शी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये येऊन चौकशी केली असता काही तक्रारदार रुग्ण , हॉस्पिटलच्या लॅबचे संबंधीत प्रमुख डॉक्टर यांच्यासमक्ष तोतया कर्मचार्याची चौकशी करण्यात आली. सदरच्या घटनेतील रुग्णांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली होती परंतु आपण त्यास पैसे दिले नसल्याचे सांगीतले. यापूर्वी आणखी किती रुग्णांना या ठकसेनाकडून ठकविण्यात आले आहे याची चौकशी पोलिसांकडून करावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे.
शहरातील शासकिय योजनांचा लाभ मिळणार्या अनेक रुग्णालयात सामान्य कुटूंबांना रुग्णालयात आल्यावरसुध्दा विविध शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गाजर दाखविण्यात येऊन काही जणांची टोळी रुग्णालयाबाहेर कार्यरत असून रुग्णांच्या नातेवाईकांडून पैसे उकळण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. याकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
रुग्ण दाखल केल्यानंतर ज्या लाभधारकांना शासकिय योजनांचा फायदा होतो त्या रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधीत रुग्णालय प्रशासनाकडून कागदपत्रांसंबंधी सांगीतले जात नाही, २४ तास उलटून गेल्यानंतर आपणास या योजनेचा फायदा देता येत नाही असे सांगीतले जाते व रुग्णांना नाहक रुग्णालयाचे बील भरण्याची वेळ येते. असे अनेक रुग्णांच्या बाबत घडत आहे.