उस्मानाबाद :- अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व उत्पादन कक्षेत मोडत असलेल्या अन्न उत्पादकांनी नमूद मुदतीत सहामाही व वार्षिक परतावा नमूद मुदतीत भरावा, अन्यथा प्रतीदिन शंभर रुपये दंड आकारण्यात येईल, अशा इशारा सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी,  अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
     जिल्ह्यातील सर्व लहानमोठ्या अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना हे आवाहन करण्यात आले आहे. यात, अन्न व्यवसाय करणारे उत्पादक, अन्न प्रक्रिया केंद्र विभागणी व दर्जानुसार दुध संकलन/ शितकरण केंद्र, दूध पॅकेजिंग व प्रक्रिया केंद्र दुधजन्य पदार्थाचे उत्पादक, पूनर्वेष्टन सॉल्वंट एक्सटॅकटींग युनिट सॉल्वंट एक्सटॅकटींग युनिट (क्लनिंग ऑफ ऑईल सिडस ऑर प्री एक्सपेलींग ऑफ ऑईल), सॉल्वंट एक्सटँकटींग अॅन्ड ऑईल रिफानिंग प्लान्ट, तेल घाणे, आटा मैदा रव्याचे उत्पादक, साखर कारखाने, गुळ उत्पादक, (गु-हाळ) डिस्टीलरीज,वाइ्नरीज,बियर उत्पादक, विदेशी दारु उत्पादक़, पॅकेज्ड डिकिंग वॉटर/ मिनीरल वॉटर उत्पादक, शीतपेय उत्पादक, मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादक, फुड अॅडिटीव्हचे उत्पादक, खाद्यरंग उत्पादक, पुरक अन्न पदार्थ उत्पादक, न्युटासिटीकल फुड उत्पादक, चहा कॉफी उत्पादक/ पॅकेर कन्फेक्शनरी उत्पादक, आईसक्रीम उत्पादक, आईस कॅन्डी उत्पादक, बेकरी फुड उत्पादन, सुकडी उत्पादक, कत्तलखाने, खारे शेंगदाणे व चणे ,फुटाणे उत्पादक, फेणी, शेवया, चकली, चिवडा इ. घरगुती उत्पादक, कॅन्डी स्लॉस (बुढीके बाल उत्पादक, चहा कॉफीचे उत्पादक /पॅकर वरिल वर्गवारीत समाविष्ट  नसलेले उत्पादक). आदींचा समावेश आहे.
    अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न पदार्थाचे उत्पादन तथा दुध व दुग्धजन्य पदार्थाचे संकलन व शितकरण केल्यावर अन्न उत्पादकांनी अन्न उत्पादक केंद्रीय परवाना धारक/ राज्य परवानाधारक/नोंदणीधारकांनी नमुद मुदतीत फॉर्म डी-1  आणि डी 2 सहामाही किंवा वार्षिक रिटर्न भरणे त्या उत्पादकांची जबाबदारी आहे. जर उत्पादकांने परतावा रिटर्न विहीत मुदतीत सादर न केल्यास प्रती दिन 100 रुपये दंडाची तरतुद करण्यात आली आहे.  
 
Top