उस्मानाबाद -: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरविंद लाटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते