पांगरी (गणेश गोडसे) :- गाताचीवाडी (ता. बार्शी) येथील कानिफनाथांची यात्रा यावर्षी कोणत्या पशुबळीविना उत्साहात व शांततेत पार पडली. प्रतिवर्षीप्रमाणेच कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ यात्रा महोत्सवानिमित्त मंदिरात व गावात पहाटेपासुनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावर्षी मात्र यात्रेनिमित पशुबळीवर बंदी घालण्‍याचा निर्णय गाताचीवाडी ग्रामस्थ व यात्रा कमिटीने घेतला होता. मंदिर परिसरात कोणीही पशुबळी देऊन त्याचा नैवैद्य मंदिरात नेऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे करण्‍यात आला होता.
    गाताचीवाडी गावाजवळील बाहयवळन मार्गालगत असलेल्या कानिफनाथ मंदिरात गुरूवारी पहाटे चार वाजता काकडा आरती करण्‍यात आली. तसेच सकाळी 9 वाजता उपस्थित भाविकांना यात्रा कमिटीतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले. त्यानंतर चार वाजता शेरणी व नंतर कानिफनाथांना पुरणपोळीचा नैवैद्य दाखवण्‍यात आला. नऊ नाथापैकीच एक असलेल्या कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त बार्शी तालुक्यासह सोलापुर, उस्मानाबाद जिल्हयातुन हजारो भाविक हजेरी लावत असतात. गाताचीवाडी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या नाथांच्या यात्रेला ग्रामस्थ एकजुटीने विविध कार्यक्रम पार पाडतात. यावर्षी मात्र यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी पारंपारीक प्रथेला व श्रध्‍देला फाटा देत, निर्णय घेत पशुबळीच्या प्रचलीत प्रथेला बंदी घातल्यामुळे या निर्णयाचे समाजातील कांही वर्गातुन स्वागत होत आहे. यात्रा महोत्सव यशस्वीरीत्या पार पाडन्यासाठी यात्रा कमिटीचे पदाधिकारी मधुकर गात भाऊ गात बाबा घाडगे सरपंच विट्टल घाडगे माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे, मायबा गात यांच्यासह गाताचीवाडी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
 
Top