पांगरी (गणेश गोडसे) :- आर्थिकदृष्टया डबघाईला येऊ लागलेल्या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचा स्त्रोत्र निर्माण करूण ग्रामस्थांच्या सहभागातुन ग्रामपंचायतींना सधन करण्‍यासाठी सुरू करण्‍यात आलेल्या संग्राम योजनेसाठी पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील पांगरी व कारी या दोन ग्रामपंचायतींसह बार्शी तालुक्यातुन बेलगांव, चुंब व खांडवी या पाच ग्रामपंचायतींची निवड करण्‍यात आली असुन भविष्यात विविध योजना व सुविधा राबवल्याच्या बदल्यात या ग्रामपंचायतींना प्रति महिना हजारो रूपयांचे सेवा शुल्क मिळणार असुन जनतेलाही असंख्य सेवा व योजना एकाच छताखाली म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयातच उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामस्थांमधुनही या योजनेचे स्वागत होत आहे. शासनाचा वेगवेगळया माध्यमातुन दैनंदीन सुविधांचे विकेंद्रीकरण करण्‍याचा प्रयत्न सुरू असुन ग्रामपंचायत कार्यालयातील लोकांची दैनंदिन रेलचेल लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातच नित्याच्या गरजा पुर्ण करण्‍यासाठी शासनाने खाटाटोप सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन ग्रमपंचायत कार्यालयालाच मिनी बँक बनवुन सुविधा दिली जाणार आहे.
    लोकांच्या दैनंदिन गरजेच्या बाबी झालेल्या दुरचित्रवाणी संच रिचार्ज, भ्रमनध्वनी रिचार्ज, बँकेतील पैसै काढणे, भरणे, रेल्वे आरक्षण तिकिट काढणे, अल्प कर्ज मंजुर करणे, वाटप करणे, झिरो बॅलन्स, खाते उघडणे, एस.टी.बस आरक्षण टिकिट, विविध विमा कंपन्याचे हप्ते भरणे, टॉप अप व्हाऊचर रिचार्ज, लाईट बील भरणे, फोन बिल भरणे, उतारे दाखले आदी एकोणिस प्रकारच्या विविध गरजेच्या सेवा ग्रामपंचायतीच्या एकाच छत्राखाली पुरवल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालयांतुन पुरवल्या जाणा-या या सुविधा एका बँकेकडुन सुविधा केंद्राच्या नावाखाली पुरवल्या जाणार आहेत.
    ग्रामपंचायती सक्षम होणारः
    संग्राम सुविधा केंद्र चालवणा-या ग्रामपंचायतींना या केंद्रामुळे आर्थिक उत्पादनाचे साधन तयार होणार आहे. या केंद्रात चालणा-या दैनंदिन व्यवहारांवर संबंधीत ग्रामपंचायतींना आर्थिक प्राप्ती होणार आहे. ज्या ग्रामपंचायत कार्यालयातील केंद्रातुन जास्त टॅन्झेक्शन अथवा इतर उलाढाली पार पडतील त्या ग्रामपंचायतींना महिन्याला हजारो रूपये कमिशनस्वरूपात मिळणार आहेत. 
 
Top