उस्‍मानाबाद :- येथील पतंजली योग समितीच्‍यावतीने यंदा प्रथमच 'खास महिलांसाठी' प्राणायाम योग साधना शिबीराचे आयोजन दि. 2 ते 8 जून या कालावधीत पहाटे पाच ते साडे सहा यावेळेत शहरातील अभिनव इंग्लिश स्‍कूल, भानू नगर येथे आयोजित करण्‍यात आले आहे.
    योग ऋषी स्‍वामी रामदेव महाराज यांच्‍या प्राणायाम योग साधनेमुळे लाखो लोक रोगमुक्‍त जीवन जगत आहेत. प्राणायाम व योगाची गरज सर्वात जास्‍त महिलांना आहे. मात्र कौटुंबिक जबाबदारी, मुलांची शाळा, यामुळे महिला स्‍वतःसाठी वेळे देऊ शकत नाहीत. त्‍यामुळे उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीत 'खास महिलांसाठी' प्राणायाम योग साधना शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. या शिबीरात महिला मार्गदर्शकांच्‍यावतीनेच प्राणायाम व योग साधना शिबीर घेण्‍यात येणार आहे.
प्राणायाम योग साधना शिबीरासाठी महिला केंद्रीय तथा राज्‍य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, महामंत्री छायाताई पवार, शारदाताई ढेरे, सरलाताई उपाध्‍याय या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबीर यशस्‍वी करण्‍यासाठी महिला पतंजली योग समितीच्‍या जिल्‍हा प्रभारी उषाताई राठोड, सविता मगर, साधना तावडे, वैजयंती दंडनाईक, सुशिला गिलबिले, उल्‍का पवार, उल्‍का मायभाटे, अमरजा सस्‍ते, चित्रा कामढणकर विशेष प्रयत्‍न करीत आहेत.   
उस्‍मानाबाद येथील पतंजली योग समितीच्‍यावतीने आयोजित 'खास महिलांसाठी' प्राणयाम योग साधना शिबीराला शहरासह परिसरातील जास्‍तीत जास्‍त महिलांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन पतंजली योग समिती संचलित किसान पंचायतीचे राज्‍य प्रभारी नितीन तावडे, पतंजली योग समितीचे जिल्‍हा प्रभारी एस.आर. पाटील, भारत स्‍वाभिमान न्‍यासचे जिल्‍हा संयोजक रणजित दुरुगकर यांनी केले आहे.
 
Top