बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या छायाचित्रांची विटंबना करुन तयार केलेली छायाचित्रे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवरील पेजवर टाकली. त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसार झाला असल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बार्शी शहरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन बार्शी पोलिस ठाण्यात गर्दि केली यावेळी निवेदने देऊन याचा त्वरीत शोध घेऊन आरोपींना शासन करावे अन्यथा त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पसरतील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जय शिवराय प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस ऍड्.राजश्री डमरे, ऍड्. गणेश चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष दिपक आंधळकर, दादा गायकवाड, श्रीकांत शिंदे, आण्णा शिंदे, सुशांत चव्हाण, अजीत बाबर, टिंकू चव्हाण, गणेश पवार यांसह विविध संघटनेचे सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या सोमवारी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बार्शी बंदची हाक देण्यात येणार असल्याचेही यावेळी पदाधिकर्‍यांनी सांगीतले.
    या प्रकरणी बार्शी पोलिसांत कलम ६६ (अ), ६५, २९५ नुसार सायबर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
Top