पांगरी (गणेश गोडसे) :- लोकसभा निवडणुकीचा धुराळा हळुहळ स्थिरस्थावर होऊ लागला असला तरी पुढारी, नेते, लोकप्रतिनिधी यांच्या डोक्यातुन मात्र अजुन निवडणुकीच वार कमी झाल्याच दिसत नाही. लोकसभा निवडणुक संपली, आता आपल काय? या प्रश्‍नाने नेतेमंडळींना चक्रावुन सोडलेले असतानाच लग्न समारंभ, वाढदिवस, बारसे आदी विविध कार्यक्रमांना नेतेमंडळींनी गांभिर्याने घेतले असुन पुढारी स्वतः जातीने या कार्यक्रमांना हजेरी लावु लागल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरी भागातही पहावयास मिळत आहे. एरव्ही भ्रमनध्वनीही न उचलणारे राजकारणी आत्ता खेडयापाडयातील आपल्या बगलबच्यांसह सर्वसामान्य नागरीकांनाही स्वतः फोन करून खुशाली विचारू लागलेले आहेत. तसेच कार्यक्रमाला आम्हालाही बोलावत जावा, अस सांगु लागलेले आहेत. एरव्ही नेत्यांच्या रस्त्यांकडे डोळे लावुन बसण्‍याची वेळ असलेल्या कार्यकर्त्यांना सध्या याच रस्त्यांवर कधीही नेतमंडळी दिसु लागली आहेत. लोकसभा निवडणुका, मंत्रीमंडळ आदी बाबी पार पडल्या तरी होऊ घातलेल्या विधानसभेचे भुत राजकारण्‍याच्या मानगुटीवर बसल्यामुळे ते जनतेसाठी कांहीही म्हणत पुढे-पुढे करू लागले आहेत.
   लोकसभा निवडणुकीमुळे कांहीजण मोदी लाटेवर स्वार होऊन विधानसभेत जाण्‍याची स्वप्ने पाहत आहेत. तर विद्यमान पदाधिकारी आपली खुर्ची टिकवण्‍यासाठी प्रयत्नशील आहेत. निवडणुकांचा हंगाम नसताना कवडीमोल किंमत ठरवत असलेल्या साध्या कार्यकर्त्यांनाही सध्या चांगलीच किंमत येऊ लागली असुन सटरफटर कार्यकर्त्यांचाही भाव चांगलाच वधारला असल्याचे दिसत आहे. यापुर्वी कार्यकर्ते नेत्यांना तुमच्यासाठी कायपण अस ठणकावुन म्हणत असायचे. मात्र आता याच्या उलट स्थिती निर्माण झाली असुन अनेकांच्या पायाखालची वाळु ढासळल्यामुळे नेतेच जनतेला आता तुमच्यासाठीच काय पण अस उघडपणे बोलुन सहानभुती मिळवु लागले आहेत.
    सध्या मात्र सगळींकडेच नेतेमंडळींची रेलचेल वाढल्याचे दिसत आहे. साधा बारशाचा कार्यक्रमाचे जरी निमंत्रण मिळाले तरी नेते रात्रीसुध्‍दा बराच वेळ कार्यक्रमांना हजेरी लावुन कार्यकर्त्यांना खेचुन घेण्‍याचा प्रयत्न करत आहेत. निमित्त असते कार्यक्रमाच. मात्र चर्चा सगळी आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींचीच. एरव्ही कार्यकर्त्यांकडे तुच्छतेने पहाणारे पुढारी सध्या त्यांच्याकडुन देवकार्य, लग्न समारंभ, नामकरणविधी, वास्तु गृह प्रवेश, नुतन दुकानाचा शुभारंभ, एवढेच नव्हे तर नुतन वाहनपुजनाच्या कार्यक्रमालाही स्वतः जातीने हजेरी लावताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर विवाहाला अथवा इतर कारणासाठी कांही आर्थिक मदत हवी का असेही विचारू लागले आहेत. कांही बिलंदर कार्यकर्ते या नामी संधीचा फायदाही उचलण्‍यास मागे पुढे पाहत नसल्याचे दिसत आहे. माझ नाय माझ्या बापाच असीच कांहीशी पुर्वी एक म्हण होती आत माझ नाय माझ्या नेत्यांच अस म्हणुन कार्यकर्तेही वगुळ येइस्तोर खाऊ लागले आहेत. कांही महिन्यांवर दिसत असलेल्या विधानसभा निवडनुकीमुळे नेत्यांनाही कार्यकर्ते नाराज करून चालणार नसल्यामुळे तेही बरच धिरानेच घेताना दिसत आहेत. पुढारीही समजुन येडयाच सोंग घेताना दिसत आहेत. शेवटी त्यांनाही माहित आहेत ना की चार दिवस सासुचे याप्रमाणे पाच महिने तुमचे तर पुन्हा पाच वर्ष आमचेच. बाकी कांही का असेना सध्या पुढारी रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावु लागले आहेत.
 
Top