उस्मानाबाद -: स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील महिलांसाठी दि.3 जून ते 02 जुलै,2014 या 30 दिवसाच्या कालावधीत राजे कॉम्प्लेक्स,3 रा मजला, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात ब्युटीपार्लर बाबत निष्णात प्रशिक्षकामार्फत थेअरी व प्रॅक्टीकल प्रोजेक्टरद्वारे शिकवली जाणार आहेत. प्रशिक्षणाच्या कालावधीत स्टेशनरी, भोजन राहण्याची सोय संस्थेमार्फत विनामुल्य केले जाणार आहे. तरी ईच्छूक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक युवराज गवळी यांनी केले आहे.
    प्रवेशासाठी ग्रामसेवकाचा दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा रहिवाशी दाखला, वय व शैक्षणिक पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट/मार्कलिस्ट, आयडेटीटी साईज 4 फोटो आदि कागदपत्रासह व्यक्तीश: भेटावे अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 7875443799 वर संपर्क साधवा, असेही आवाहन एका पत्रकान्वये केले आहे.
 
Top