बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्यातील बावी (आ.) येथील ग्रामपंचायत सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर केल्याने राजकिय वातावरण गरम झाले आहे. गजेंद्र माधव काकडे असे सरपंचाचे नांव असून दि. ७ मे २०१४ रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला . यानंतर तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्या उपस्थितीत दि. २९ मे रोजी पडताळणी करण्यात आली यावेळी सरपंचाविरुध्द ठरावास ८ सदस्यांनी मतदान करुन ८ विरुध्द १ अशा बहुमताने ठराव संमत करण्यात आला.
    सदस्‍य सुर्यकांत आगलावे, लहू आगलावे, फन्‍नुदीन शेख, सोपान काळे, गणेश निर्मळ, संगीता पाटील, ज्‍योती ठाकरे, सुवर्णा बरडे हे सदस्‍य उपस्थित होते. तर सरपंच गजेंद्र काकडे व सुरेखा आगलावे हे गैरहजर होते. तहसिलदार यांनी ज्‍यांना अविश्‍वास ठरावाच्‍या बाजूने मतदान करावयाचे आहे त्‍यांनी हात उंचावून मत नोंदवावे, असे म्‍हटल्‍याबरोबर आठ विरुध्‍द एक असे मतदान होऊन अविश्‍वास ठराव संमत करण्‍यात आला. अविश्‍वास ठराव मंजूर होताच माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सदस्‍यांचे अभिनंदन केले. लवकरच नवीन सरपंचाची नियुक्‍ती करण्‍यात येईल, असे यावेळी सांगण्‍यात आले.
 
Top