उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील एम. आय. डी. सी. परिसरात असलेल्या गाव दर्शक फलकास नांदेड-सोलापूर ही बस धडकून अपघात झाला. या अपघातात ३६ जण जखमी झाले असुन जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
    दि. २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नांदेड-सोलापूर (क्र. एम. एच. ४० एन- ९१७१) ही बस नांदेडहून सोलापूरकडे जात असताना उस्मानाबाद शहरातील एम. आय. डी. सी. परिसरात आली. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी गाव दर्शक फलकास जाऊन धडकली.
    या अपघातात बसमधील ३६ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
    याबाबत शहर पोलिस ठाण्यात रामचंद्र ज्ञानोबा शिंदे (वय ४२) रा. मोळंबी ता. नायगाव जि. नांदेड यांनी बस चालक सुधाकर हरीभाऊ देवकर रा. मुरूड जि. लातूर यांच्या विरोधात फिर्यादी दिली असुन बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पी. एस. आय. शहाणे हे करीत आहेत.
 
Top