बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी टेक्सटाईल मिलमध्ये कंत्राटी काम करणार्‍या कामगार केतन शेळके याचे काम बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवार व शनिवारी दोन दिवस निदर्शने करण्यात आले.
    केतन याचे नातेवाईक मयत झाल्याने रजेचा अर्ज देऊन अंत्यविधीसाठी गेल्याने त्याचे काम बंद केल्याचे शेळके याने म्हटले आहे. मिल्सचे जनरल मॅनेजर यांच्याकडून कामगारांवर दबाव, दमबाजी, दहशत होत असल्याचे काम बंद केलेल्या कामगाराचे मत आहे. कामगार नेते कॉं.तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे. दि.२८ रोजी तहसिलवर मोर्चा तसेच ४ जून रोजी जेलभरो आणि दि.९ जून पासून कामगारांचे आमरण उपोषण सुरु करण्यात येईल असे लेखी निवेदन कामगार संघटनेने दिले आहे.
    आंदोलन सुरु असतांना मॅनेजर यांच्याकडून आंदोलनात चिथावणी देण्यासाठी समोर येऊन थांबणे व बघत राहण्याचे प्रकार होत असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे. यावेळी शौकत शेख, धनंजय शिंदे, रंगनाथ शिराळ, कृष्णा खंडागळे, केतन शेळके, विजय वाघ, बालाजी वाघमारे, महेस मिठे व आयटकचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top