बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वक्तृत्व स्पर्धामधून विविध विषयांवर दर्जेदार विचारमंथन होवून सार्वजनिक जीवनातील महत्वाच्या समस्यांवर प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा आरएसएमसमाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केली. मिरगणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठ प्रतिष्ठानच्यावतीने   
       आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. धाराशिव शिवसेना जिल्हापरिषद गटनेते दत्तात्रय सांळुके, संयोजक शिवाजी पवार, नानासाहेब कदम, अजित कुकूंलोळ, परिक्षक रामचंद्र इकारे, पत्रकार सचिन वायकुळे, वसिमशेख, किशोर मांजरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मिरगणे म्हणाले सार्वजनिक जीवनात कोणत्याही क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणार्‍या व्यक्तीला सभा धीटपणा आणि वक्तृत्व कला अवगत असणे गरजेचे आहे. या स्पर्धामधून अनेक चांगले वक्ते उदयास येतील मित्र परिवाराचा हा स्तुत्य उपक्रमआहे. सावळे सभागृहामध्ये झालेल्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्तमप्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल असा - अङ्गसर शेख (अह.नगर,प्रथम क्रमांक ११,००० रु.), अश्‍विनी वडगावे, रोहीत देशमुख (औरंगाबाद, द्वितीय विभागून, ७०००रु.),काजल बोरस्ते (नाशिक, तृतीय क्रमांक ५०००रु.). उत्तेजनार्थ - मनस्वी गादेकर (बार्शी, प्रथम क्र. २०००रु.), आनंद मसलखांब (द्वितीय, २०००रु.) व पंकज पवार (बार्शी, तृतीय, २००० रु.).
 
Top