पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता. बार्शी) येथील ग्रामीण रूग्णालयातील विविध समस्या व ओपीडी रूग्णसेवेबाबत तुळजापुर लाईव्हवर वृत्त प्रसिदध होताच स्थानिक आरोग्य प्रशासनाने त्याची दखल घेऊन पांगरी ग्रामिण रूग्णालयातील बाहयरूग्ण सेवेत बदल करून ती सेवा पुर्वीप्रमाणेच पुन्हा दोन टप्यात सुरू केली आहे. आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पांगरीसह परिसरातील गांवातुन समाधान व्यक्त केले जात असुन तुळजापूर लाईव्‍हला धन्यवाद दिले जात आहेत.
     याबाबत अधिक माहिती अशी की, पांगरीसह परिसरातील असंख्य गावातील रूग्णांच्या सोईसाठी येथे लाखो रूपये दहा एकर क्षेत्रात अदयावत असे रूग्णालय सुरू आहे. मात्र अलिकडील कांही काळात पांगरी ग्रामीण रूग्णालयात स्थापनेपासुन दोन टप्यात सुरू असलेली ओपीडी सेवा अधिका-यांनी कोणतीही पुर्वकल्पना न देता बंद करून ती एकाच टप्यात सुरू ठेवली होती. त्यामुळे रूग्णांना दररोज सकाळीच उपचार उपलब्ध होत होते. दुपारनंतर ओपीडी व्यवस्था नसल्यामुळे अनेक रूग्णांना नाहक त्रास सहन करून पर्यायी खासगी दवाखान्यांचा आधार घेऊन आर्थिक भुर्दड सहन करावा लागत होता. मात्र प्रशासन याबाबत ठोस निर्णय घेताना दिसत नव्हते. गरजु रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्याबाबत सविस्तर तुळजापुर लाईव्हने वृत्त प्रसिदध करून आवाज उठवला होता. याची दखल घेऊन पांगरी ग्रमिण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक सौ.यु.टी.वाघमोडे यांनी सकाळी 9.30 ते दुपारी 1 व नंतर चार ते सहा अशा दोन टप्यात ओपीडी सेवा सुरू ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या या निर्णयाचे स्वागत होत असुन त्यामुळे रूग्णांना मफक दरात व वेळेवर सेवा मिळण्‍यास मदत होणार आहे.
 
Top