![]() |
राजेंद्र बाकले |
पांगरी (गणेश गोडसे) :- शेती नांगरण्यासाठी आलेल्या टॅक्टरचालकाचा वाहनावरील ताबा सुटुन टॅक्टर पन्नास फुट खोल विहीरीत पडल्यामुळे झालेल्या अपघातात एका बावीस वर्षीय तरूण चालकाचा विहीरीत टॅक्टरखाली दबुन जागेवरच मृत्यु झाल्याची हदयद्रावक घटना आज बुधवार दि. 7 मे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ममदापुर (ता. बार्शी) येथील साठवण तलावाच्या भरावाजवळ घडली.
राजेंद्र वसंत बाकले (वय 22, हल्ली रा. पांगरी) असे टॅक्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अविवाहित टॅक्टर चालकांचे नांव आहे. अपघातात टॅक्टरचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मयत चालक राजेंद्र बाकले हे खामगांव येथील शिवाजी प्रल्हाद जगताप यांच्या मालकीच्या बिगर क्रमांकाच्या टॅक्टरने आज सकाळी ममदापुर शिवारात असलेल्या जनाबाई भागवत गोरे यांच्या मालकीच्या गट नंबर 363 मधील शेतात टॅक्टरने नांगरटीचे काम करत होते. त्यांचा दुसरा जोडीदार हा टॅक्टरसाठी डिझेल आणण्यासाठी पांगरीला गेला असताना मयत बाकले यांना विहीरीचा व वाहनाच्या गीयरचा अंदाज न आल्यामुळे टॅक्टरसह ते खोल विहीरीत पडले. टॅक्टर विहीरीत पडताना टफ खाली व टायर वरती अशा पध्दतीने पडल्यामुळे मयत बाकले हे टॅक्टरखाली दबले जावुन व गाळात रूतुन ते जागेवरच मयत झाले. मयत राजेंद्र बाकले यांचे मुळ गांव खामसवाडी (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) असुन त्यांचे वडील कामधंदयाच्या निमित्ताने पांगरी येथे स्थायीक झाले आहेत.
टॅक्टरमालक जगताप यांनी दहा दिवसांपुर्वीच टॅक्टर घेतलेला होता. टॅक्टरचा विहीरीत चक्काचुर झाला. विहीरीत फक्त टॅक्टरचे टायरच दृष्टीस पडत होते. घटना घडल्यानंतर झानपुर, ममदापुर, पांगरी, गोरमाळे आदी गावांमधील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला. टॅक्टर लोकांनी उचलुन मृतदेह विहीरीबाहेर काढण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. मात्र टॅक्टर गाळात रूतल्यामुळे शेवटी पोकलेनच्या मदतीने तीन तासांनंतर मृतदेह विहीरीबाहेर काढण्यास यश आले. पांगरी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पांगरी पोलिसात मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.