पांगरी (गणेश गोडसे) :- इलेक्ट्रिक मिटरमध्ये शॉटसर्किट होऊन कापसाच्या कारखान्यास आग लागुन 6 लाख 10 हजार रूपयांचे साहित्य व मशिनरी जळुन खाक झाल्याची घटना सोमवार रोजी दुपारी जामगांव (ता. बार्शी) शिवारात घडली.
    दिपक सोमनाथ तलवाड (वय 31, रा.बालाजी कॉलनी बार्शी) यांनी पांगरी पोलिसात खबर दिली आहे. तलवाड यांनी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की जामगांव (आ) शिवारात त्यांच्या असलेल्या कापुस कारखान्यात काल दुपारी विज वितरण कंपनीच्या कनेक्शन मिटरमधुन वायरचे स्पार्किंग होऊन व इलेक्ट्रिक सर्किट होवून एक लाख रूपये किंमतीच्या दोन वेस्ट कॉटनच्या मशीनरी एक लाख रूपये किंमतीची एक प्रेस मशिन 65 हजार रूपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार अडीच लाख रूपये किंमतीचे तयार कापडाचे गठठे सहा हजार रूपये किंमतीचा कच्चा माल पंधरा हजार रूपये किंमतीचे पन्हाळी पत्रे व वीस हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा सहा लाख दहा हजार रूपये किमंतीचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडुन जखुन खाक झाले. तलवाड यांच्या खबरीवरून अकस्मात जळित म्हणुन गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.
 
Top