वैराग (महेश पन्‍हाळे) : महापारेषण कंपनीच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित २२० के.व्ही.बार्शी सब स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले.
    महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (MSEB) या कंपनीचे विभाजन होऊन ०६ जून २००५ रोजी तीन कंपन्या करण्यात आल्या त्यात महानिर्मिती (Maharashtra State Electricity Generation Company) , महापारेषण (Maharashtra State Electricity Transmission Company), महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Company Ltd) असे तीन भाग पडले होते.
        ६ जून रोजी महापारेषण कंपनीचा उदय झाला. तेव्हा पासून प्रत्येक वर्धापनदिनानिमित विविध कार्यक्रम आयोजित केले जातात व त्यातून वेगवेगळे संदेश दिले जातात.या वर्षी हि सोलापूर बाळे येथे रक्तदान शिबीर, कर्मचायांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते . तसेच बार्शी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केल्याचे मुकुंदराज कुलकर्णी (उप.कार्यकारी अभियंता) २२० के.व्ही.सब स्टेशन, आगळगाव रोड, बार्शी यांनी सागितले .
         सकाळी ११ वाजता बार्शी येथे २२० के.व्ही.बार्शी सब स्टेशन व सब स्टेशन वसाहती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. तसेच “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश देण्यात आले .या कार्यक्रमाला श्री .मुकेश कुमार मिश्रा ( क.अभियंता बार्शी) व सब स्टेशनचे सर्व कर्मचारी हजर होते .
       या निमित श्री .मुकुंदराज कुलकर्णी (उप.कार्यकारी अभियंता बार्शी) यांनी महापारेषण कंपनीवर  महापारेषण गीत लिहले होते त्याचे गायन त्यांनी केले .
        प्रकाशपूष्पे उधळीत आले , महाराष्ट्राचे हे एक भूषण ,
        दिशादिशातून घोष नीनादे , “ महापारेषण महापारेषण ”i|
                  उंच मनोरे आकाशगामी
                  तेजाचे जणू सेनिक नामी
        अहोरात्र ते तत्पर करिती प्रकाश - सामाज्याचे रक्षण |
                  निनादते तारातून अविरत
                  उर्जेचे संजीवक संगीत
        उच्चदाब वाहिन्या निर्मिती , धरतीवरती जणू नंदनवन |
                  सोदामिनी हि प्रकाश – ज्योती
                  प्रखर तियेची लखलख दीप्ती
        आकाश – कन्या येई भूवर , घेवूनी शीतल रूप सुलक्षण |
                  या देवीची किमया न्यारी
                  तिच्या प्रसादे सुखयेदारी
        उद्योगाची फिरती चक्रे ,फुले शिवारी हिरवे जीवन |
                 उपकेंद्र जणू उपस्नास्थळ
                 कर्तव्यच जणू पूजा सोज्वळ
       ‘ग्राहक’ आमचा देव त्याला , प्रसन्न करण्यावेचू क्षणक्षण |
 
Top