उस्मानाबाद -: येथील जिल्हा रुग्णालयात स्व.डॉ.राम लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मरणार्थ नेत्रविभागात दृष्टीदीन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.भालचंद्र यांच्या प्रतिमेस जिल्हा चिकित्सक डॉ.जयपाल चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
       याप्रसंगी स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राहूल वाघमारे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. मिलिंद पौळ, डॉ.ज्योती कल्याणी, डॉ.आळंगेकर, डॉ.होनखांबे तसेच अधिसेविका श्रीमती व्ही.के. पानसे,नेत्रचिकित्सा अधिकारी के.बी.गुंड,बी.एम. घाडगे,शेख ए.एल.वॉर्ड इन्चार्ज श्रीमती बागडे, अधिपरिचारिका श्रीमती बबीता पाटील,श्रीमती क्रांती रणखांब,जयश्री कापडे,संदिप उंदरे, महादेव गायकवाड, अंकुश पाटील, श्री. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
      सन 2013-14 मध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मोतिबिंदू शस्त्रक्रियाचे उदिष्ट पूर्ण करताना महाराष्ट्रात जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद मधील नेत्रविभागाचा  प्रथम क्रमांक आला आहे तर रुग्णालयातील मरणोत्तर नेत्रदान कार्यात देखील उस्मानाबाद जिल्हा अग्रेसर आहे. यादिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण येथील शिबीरात 19 रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी जिल्हा रुग्णालयातील नेत्रदान समुपदेशक श्री. उमेश गोरे यांनी दृष्टीदीनाचे महत्व सर्वांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रचिकित्सा अधिकारी शेख अयुब यांनी तर  डॉ. मिलिंद पौळ यांनी आभार मानले.                
 
Top