पांगरी (गणेश गोडसे) :- मार्च 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पांगरी (ता. बार्शी) येथील सर्वोदय विदया मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविदयालयाचा सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असुन मराठी माध्यमाचा निकाल 80 टक्के लागला आहे. विवेक विजयकुमार माळी यांने 87.40 टक्के गुण मिळवुन प्रशालेत व केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रविण संजय शिंदे याने 87 टक्के गुण मिळवुन प्रशालेत द्वितीय तर अमोल संजय रायभान याने 82 टक्के गुण मिळवुन प्रशालेत तृतीय आला. कु.कोमल अरूण शेळके हिने 82 टक्के गुण मिळवुन प्रशालेत चौथी आली. सर्वोदय विदया मंदिर प्रशालेतील 19 विदयार्थी विशेष प्राविण्यासह तर 34 विदयार्थी प्रथम श्र्रेणीमध्ये उतिर्ण झाले आहेत.
तसेच न्यु इंग्लीश स्कुल अंबेजवळगेचा निकाल 90 टक्के लागला आहे. महेबुब पैंगबर शेख याने 86.40 टक्के गुण मिळवुन प्रथम आला. तर कु.पुनम प्रमोद मंडलीक हिने 85.60 टक्के गुण मिळवुन द्वितीय तर समाधान युवराज कोळेकर याने 77.80 टक्के गुण मिळवुन प्रशालेत तृतीय येण्याचा बहुमान मिळवला. संस्थाध्यक्ष बापुसाहेब नारकर, सचिव शशिकांत नारकर, प्रतिक नारकर, मुख्याध्यापक अशोक मुंढे यांच्यासह शिक्षक वर्गातुन यशस्वी विदयार्थांचे अभिनंदन होत आहे.