सोलापूर :- सन 2014-15 या वर्षात कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
       पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/ संस्था यांनी विहित नमुन्यात अर्ज भरुन त्यासोबत कार्य केल्याचे पुरावे सादर करावेत व परिपूर्ण अर्ज भरुन दिनांक 30 जून 2014 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांच्याकडे सादर करावेत. विहित मुदतीनंतर व विहित नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
      अर्जासोबत संबंधित व्यक्तींनी जिल्हा पोलीस विभागाकडील आपल्या चारित्र्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रस्ताव 3 प्रतीत फाईलसह सादर करावा अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सोलापूर फोन नं 0217-2734950 येथे संपर्क साधावा असे श्रीमती मनिषा फुले, सहायक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांनी कळविले आहे.
 
Top