बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कासारवाडी (ता.बार्शी) येथील योगीराज वेदविज्ञान आश्रमातील एप्रिल २०१३ पासून सुरु असलेल्या यज्ञांचा राजा म्हणून परिचित असलेल्या ऐतिहासिक साग्निचीत अश्वमेध महासोमयाग यज्ञ अंतीम चरणात आला आहे. त्याबाबतच्या महत्वपूर्ण विधी व इष्टी संपन्न होत असल्याची माहिती वेदविज्ञान आश्रमाचे संचालक नारायण उर्फ नाना काळे व दिक्षीत केतन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
         या यज्ञाच्या सुरुवातीपासून आवश्यक असलेला पंचकल्याणी अश्व (घोडा) याच्या गुडघ्याच्या खाली तसेच तोंडाच्या पुढील भागात पांढरा रंग यासह विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असल्याची कसोटी घेण्यात आली. या अश्वासाठी संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी शोध घेऊन उपलब्धता करण्यात आली. यासह विविध प्रकारच्या गायी, हत्ती आदी यज्ञाच्या वेळी समोर हजर असतात. उडत्या गरुडाची ४५ फुट लांब, २६ फूट रुंद व ८ फुट उंचीची भव्य यज्ञवेदी तयार करण्यासाठी आवश्यक विविध तत्वांच्या माती उपलब्ध करुन त्याच्या विटा आश्रमातच भट्टी घालून तयार करण्यात आल्या. या विटा षोडशी, आग्निध्रियम, गार्हपत्येष्टिका, अर्धेष्टका, पक्षाग्रीया, पक्षमध्यीया, होत्रियम, मार्जालियम, पक्षेष्टका, पादेष्टका आदी विविध तसेच विशिष्ट आकारांच्या बनविण्यात येतात त्याची तंत्रशुध्द पध्दतीने निर्मिती करण्यात आली. या गरुडवेदी ३ प्रकारे तयार करण्यात येतात. सहस्त्र (हजार) वीटांची गरुडचीती तयारकरण्यासठी २०० विटांच्या एक स्तर अशा प्रकारचे पाच स्तर एकावर दुसरा ठेवण्यात येतात. 
          याच प्रकारे द्विसहस्त्र करीता दहा व त्रीसहस्त्रकरिता पंधरा स्तर मंत्रपूर्वक ठेवण्यात येतात. हा अश्वमेध यज्ञ अठराशे वर्षानंतर प्रथमच होत असून यापुढेही हजारो वर्षे जतन होण्यासाठी उडत्या गरुडाची वेदी तयार केली जात आहे. या यज्ञाची संपूर्ण माहिती ताम्रपटावर कोरण्यात आली असून दगडाच्या पेटीत बंद करुन वेदीच्या पाया भरणीत हा ताम्रपट ठेवण्यात आला आहे. कोणतेही कार्य सिध्दीसाठी संकल्प महत्वाचा असतो. वैदिक हिंदु संस्कृतीचे पुनरुत्थान व बलसंपन्न, समृध्द भारताच्या निर्मितीसाठी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ.जयंत बाळाजी आठवले, शक्तिपाताचार्य शरद जोशी यांच्या हस्ते संकल्प करण्यात आला होता. यजमानाचा संकल्प गवामयन सत्री दिक्षीत नाना काळे व सौ.वैजयंत काळे यांनी केला. यज्ञासाठी आवश्यक असलेल्या पंचकल्याणी अश्वास अकरा महिने देशातील विविध भागांत शोभायात्रेद्वारे भ्रमण करण्यात आले. यावेळी यज्ञ संस्था आणि वेदांचे महत्व सांगण्यात आले. ऊर्षभरापासून दररोज तीन प्रमाणे एक हजार ऐंशी सावित्री इष्ट्या करण्यात आल्या. 
         दि. ८ जून पासून अश्वमेध महासोमयागातील महत्वाचे विधी संपन्न होत आहेत. दि. ८ ते २० जून पर्यंत दिक्षा विवृध्दी सप्तदिनात्मक अधिक षडिदक्षा ६ दिवस असे १३ दिवसांचे दिक्षाविधी, दि.१५ जून दीक्षणीयइष्टी व यजमानांचे क्षौर, प्रागवंशकरण, दिक्षा, केशनिदिक्षा, पावमानिं दिक्षा, नामनिर्देश व नवनीत दिक्षा देण्यात आली. ऐषऋत्वीज वरण, मधुपर्क पूजन प्रायणीइष्टी, सोमक्रय, आतिथ्य इष्टी पुर्वाह्ण प्रथमवर्ग्य उपसद, गरुडचितीचे प्रथमप्रस्तराचे उपधान, अश्वप्रणयन, प्रवर्ग्य व त्रिसाहस्त्र गरुडचितीचे १५ स्तराचे उपाधान व सहस्त्र हिरण्यानी चितीचे प्रोक्षण, महाग्निस्थापन प्रवर्ग्य उद्वासन, अग्निपोमीय याग असे विधी १२ दिवस सुरु आहेत. दि.४ व ४ जुलै ओजी अश्वत्रिरात्र सोमयागातील प्रथम सुत्याह गोतमो चतुष्टोमातील अग्नीष्टोम व रात्रभर अन्नहोम होणार आहे. दि.५ ते ८ जुलै दरम्यान दुसरा उक्थ्यसोमयाग होणार आहे. ७ जुलै रोजी यजमानास युध्दसज्ज वेश परिधान करुन, शस्त्रसज्ज करुन अश्वरथावर आरुढ करण्यात येणार असून यावेळी त्याच्याकडून देशाच्या शत्रूचा नाश करण्याची घोषणा करण्यात येईल. अशा प्रकारचे अनेक विधी संपन्न होत असून १५ जुलै ओजी संतपूजा, अग्रपूजा होत आहे.
    भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक मूल्यांना महत्व आहे, शासनावर नैतिकतेचा अंकूश ठेवण्यासाठी प्रबळ चारित्र्यवान शासन निर्माण होणार्‍या राजसूय व अश्वमेध महायज्ञात आध्यात्मिक पुरुषांचा पूजन सोहळा यजमानांनी करावा लागतो. २०१४ मधील झालेले सत्तापरिवर्तन हे संतांचा संकल्प, राजसूय, अश्वमेध सोमयागामुळे निर्माण झालेला सुक्ष्माती परिणाम आहे. यासाठी दि.१५ जुलै रोजी संतपूजेने या साग्निचीत अश्वमेध महासोमयाग यज्ञाची सांगता होणार आहे.
    १२ दिवस सकाळी, संध्याकाळी प्रगर्ग्य अनुष्ठान (मातीच्या महावीर पात्रात गायीचे तुप उकळुन त्यामध्ये गायीच्या दूधाची आहुती घातल्याबरोबरच ४० ते ४५ फुट उंच अग्नीज्वाला आकाशात प्रक्षेपीत होतात. ऊैश्विक शक्ती सक्रीय करण्याचा हा विधी आहे.)
    या हवनामध्ये सर्वांना सहभागी होण्यासाठी श्रीसुक्त, रुद्र, गणपती उर्वशीर्ष, चंडीयाग इत्यादींचे आयोजन केले आहे. हे यज्ञ दि.२६ जून ते १४ जुलै २०१४ या कालावधीत होत आहेत.
   २१ जून पासून २ जुलैपर्यंत सुरु असलेले सुब्रम्हण्यम आवाहन हे इंद्रदेवतेस पर्जन्यासाठी सुरु आहे. यामुळे ५० ते १०० किलोमीटरच्या परिसरात चांगला पाऊस पडेल. अशी माहिती दिक्षीत केतन काळे यांनी दिली.
 
Top