पांगरी (गणेश गोडसे) :- सिमेंट रस्त्यांवरून येण्‍याजाण्‍याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हानामारी होऊन दोन्ही गटातील पाचजण जखमी झाल्याची घटना सोमवार दि. 23 जून रोजी रात्री सात वाजण्‍याच्या सुमारास कारी (ता. बार्शी) येथे घडली.
    शांताबाई दशरथ जाधव, शितल जाधव, सोमनाथ रामलिंग करडे, निळुबा करडे, राहुल करडे असे मारहानीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील लोकांची नांवे असुन परस्परविरोधी फिर्यादिवरून दोन्ही गटातील तेरा जणांविरूदध पांगरी पोलिसात मंगळवार रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन दोन्ही गटातील चौघांना अटक करण्‍यात आले आहे. सोमनाथ रामलिंग करडे, निळु करडे, रामलिंग करडे, सुलाबाई रामलिंग करडे, लहु करडे, सोजर करडे, बापु अंकुश करडे, शांताबाई जाधव, रागिनी जाधव, शितल जाधव, अनिता जाधव व दशरथ जाधव अशी परस्परविरोधी फिर्यादिवरून गुन्हे दाखल झालेल्या दोन्ही गटातील लोकांची नांवे आहेत. सोमनाथ करडे, निळु करडे, बापु करडे व दशरथ जाधव या चौघांना अटक करण्‍यात आले आहे.
    एका महिलेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ती व तीची मुलगी अशा दोघीजणी घरासमोर बोलत बसल्या असताना सोमनाथ करडे हा सिमेंटच्या ओल्या रस्त्यावरूण जात होता. रस्ता ओला आहे, तो खराब होईल, तु जाऊ नकोस, असे त्या महिलेने करडे याला म्हटले असता करडेने शिविगाळ करण्‍यास सुरूवात केली. दरम्यान त्या महिलेल्या मुलीने तेथे येऊन सोमनाथ करडे यास तु आमच्या आईस विनाकारण शिविगाळ का करतोस असे म्हटले असता तिला वाईट हेतुने धरुन झोंबाझोंबी करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच संगनमताने लाथा बुक्यांनी मारहान करून जखमी केले.
    विरोधी सोमनाथ करडे या तरूणाने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तो शांताबाई जाधव यांच्या घरासमोरून चालत किराणा दुकाणाकडे माल आणण्‍यासाठी जात असताना सिमेंट रस्त्यावरून का जातोस असे म्हणत फिर्यादीस अडवुन संगनमत करूण त्याच्या खिशातील रोख दोन हजार रूपये काढुन घेऊन व लाथा बुक्यांनी मारहाण केली. निळोबा करडे व राहुल करडे हे दोघे भांडणे सोडवण्‍यास आले असता त्यांनाही मारहान करण्‍यात आली.
    बारा जणांविरूध्‍द पोलिसात मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत.
 
Top