उस्‍मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी २७ जून १९६६ रोजी अशोक जगदाळे  यांचा जन्‍म झाला. घरची बेताची परिस्थिती असतानाही शिक्षणाच्या आवडीने आणि ध्यासाने त्यांनी कमवा व शिका या तत्त्वाचे पालन करत दहावी पर्यंतचे शिक्षण नळदुर्ग येथील जिल्‍हा परिषदेत  पूर्ण केले. त्‍यानंतर त्‍यांनी गुलबर्गा येथे सिव्हिल डिप्‍लोमाचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्‍यांनतर वयाच्या अवघ्‍या १८ व्या वर्षी सिव्हिल इंजिनियर होण्याचे त्यांचे स्वप्न मुंबई महापालिकेत १९८४ साली रुजू झाल्‍याने साकार झाले. सिव्हिल इंजिनियरिंगचा संबंध नैसर्गिक गोष्टी व विकासाशी येतो आणि स्थापत्यशास्त्र ही सर्व उद्योगांची जननी आहे असा विचार करून त्यांनी नौकरी करीत असतानाच रात्रीच्‍या शिक्षणातून सिव्हिल इंजिनियर डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या जिद़द व चिकाटीचा त्यांना शिक्षण घेत असताना खूप फायदा झाला.
सुरुवातीपासूनच त्‍यांची जास्‍त काळ नोकरी न करता स्वताचा उद़योग व्‍यवसाय उभारण्याची महत्त्वाकांक्षा होती.  त्‍यांनी १९९० साली महापलिकेतील नौकरीचा राजीनामा देवून जगदाळे अॅन्‍ड असोसिएटस या छोटया फर्मची स्‍थापना केली. सुरुवातीच्‍या काळात छोटी- मोठी कामे करीत व्‍यवसायावर जम बसविण्‍याचा प्रयत्‍न केला. या कंपनीच्‍या माध्‍यमातून काम करीत असताना उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. कोणतीही व्यावसायिक परंपरा नसताना, पैशाचे पाठबळ नसताना, केवळ जिद्द आणि  ज्ञानाच्या जोरावर  त्‍यांनी २००० साली ‘दष्‍टी इंजिनअरिंग डेव्‍हलपर्स’ या कंपनीच्‍या माध्‍यमातून बांधकाम क्षेत्रातील मोठे व्‍यावसाय करण्‍यास सुरुवात केली. त्यांनी अत्यंत चिकाटीने कामे पूर्ण केल्याने त्‍यांना अल्‍पावधितच मुंबई शहरातील मोठे व्यावसायिक म्हणून ओळखले जाऊ लागले.
या कंपनीच्‍या माध्‍यमातून अल्‍पवाधितच अशोक जगदाळे यांचे नाव सर्वत्र झाले. २००५ साली दष्‍टी फर्ममध्‍ये त्‍याचे रुंपातर केले. तर २००७ साली त्‍यांनी दष्‍टी ग्रुपची स्‍थापना केली. आजमित्‍तीस मुंबईस राज्‍यभरातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी दष्‍टी उदयोग समुहाच्‍या माध्‍यमातून ४५० कोटी रुपयांचे प्रोजेक्‍ट सुरु आहेत. कोणतेही काम उत्तम दर्जाचे व वेळेवर करण्याचे बांधकाम शास्त्राचे अर्थशास्त्र अशोक जगदाळे यांनी अंगिकारले आहे. 

आपण ज्‍या मातीत वाढलो आणि मोठे झाले त्‍या समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दत हेतूने त्‍यांनी नळदूर्ग या आपल्‍या जन्‍मगावाशी नाळ जोडलेली होती. त्‍यातूनच त्‍यांनी २०१० साली नळदुर्ग शहरालगत असलेला तुळजाभवानी शेतकरी सहकार साखर कारखाना चालविण्‍यास घेतला. त्‍यांनी कारखाना चालविण्‍यास घेण्‍याअगोदर दोन वर्षांपासून हा कारखाना बंद होता. राज्‍यातील कोणताही मोठा उदयोजक हा कारखाना चालविण्‍यासाठी घेण्‍यास तयार नव्‍हता. मात्र, त्‍यानी केवळ समाजाविषयी असलेली बांधिलकी लक्षात घेवून हा कारखाना भाडेतत्‍वार सहा वर्षांसाठी चालविण्‍यास घेतला. कारखाना दोन वर्ष चालवत त्‍यांनी एक वर्ष गाळप करून परिसरातील शेतक-यांची वाहवहा मिळवली. मात्र, हा कारखाना उस्‍मानाबाद ज्लिहा मध्‍यवर्ती बँकेचा कर्जदार असल्‍याने त्‍यांनी कारखान्‍याला जप्‍तीची नोटीस पाठविली. त्‍यामुळे कारखाना कर्जाची रक्‍कम भरत नसल्‍याने जगदाळे यांचा भाडेतत्‍ववरील करार मध्‍येच मोडण्‍यात आला. यामुळे त्‍यांना सहा कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्‍यानंतरही त्‍यांनी न डगमगता सामाजीक कार्य सुरुच ठेवले आहे.

त्‍यांनी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिराचा जीर्णोध्‍दार केला आहे. त्‍यासाठी त्‍यांनी मोठी देणगी मदत म्‍हणून दिली आहे. त्‍यासोबतच नळदुर्ग परिसरातील नंदगाव व अनेक गावातील मंदिर जीर्णोध्‍दरासाठी मोठी देणगी देवून समाजप्रती असलेली निष्‍ठा त्‍यांनी दाखवून दिली आहे.  त्यासोबतच जगदाळे यांनी नळदुर्ग येथे १७ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन केले होते. या विवाह सोहळयात १९ जोडप्यांचे विवाह करण्यात आले. या सोहळयासाठी तालुक्यातून वीस हजारपेक्षा आधिक नागरिक जमले होते.  आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना त्यामुळे मोठी मदत झाली आहे. याशिवाय त्यांनी समाजातील अनेक गरजुंना मदत केली आहे. कित्येक पेशंटना ऑपरेशनसाठी मदत म्हणून त्यांनी देणगी स्वरूपात रक्कम दिली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यासोबतच नळदुर्ग शहरात त्यांनी पाणपोई सारखे सामाजीक उपक्रम राबवत समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम केले आहे. महिलांचे आरोग्य सुलभ रहावे म्हणून त्यांनी काटगाव, जळ‌कोट व नळदुर्ग येथे मोफत स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन केले.

आगामी काळातही जगदाळे हे तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविणार आहेत. विशेषता, तुळजापूर तालुक्यात मोठे उद्योग नसल्याने बेराजगारीचे प्रमाण अधिक आहे. युवा वर्गातील बेरोजगाराचे प्रमाण कमी व्हावे याकरीता ते कारखान्याची उभारणी करणार असून त्‍यामाध्‍यमातून तालुक्‍यातील अनेकजणांना रोजगार उपलब्‍ध होणार आहे. त्यासोबतच शैक्ष‌णीक संस्था उभारण्याचा त्यांचा मानस आहे. गेल्‍या ३० वर्षापासून अविरतपणे उदयोग क्षेत्रात व समाजसेवा करीत असलेल्‍या जगदाळे यांचा तुळजापूर तालुक्यातील जनेतेची सेवा करायची आहे.  आगामी काळात त्‍यांना लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करायची आहेत. त्यामुळे त्यांचे जनेतेचे सेवा करण्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दे हीच त्यांच्या वाढदिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना. 
 
Top