नळदुर्ग  -   एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात उदयोग व्‍यवसायांनी भरारी घेतली आहे. आता प्रत्येक क्षेत्रात उदयोजक पाय रोवून खंबीरपणे उभे आहेत.नळदुर्गचे सुपूत्र अशोक भाऊ जगदाळे यानी  डिप्‍लोमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जास्‍त काळ सरकारी नौकरी न करता करिअर म्हणून उद्योगची सुरुवात केली.
    उदयोजक अशोक जगदाळे  यानी स्‍वता बरोबरच अन्‍य काही युवकांना रोजगार मिळवून देत स्‍वताच्‍या पायावर उभे करण्‍याची किमया  साधली आहे. त्‍यांच्‍यामुळेच आज अनेक युवकांना स्‍वताच्‍या पायावर उभे राहता आले आहे. त्‍यांनी अनेक संसराला उभारी देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांचा हा उपक्रम कौतुकास्‍पद तर आहेच त्‍याशिवाय समाजासाठी ‘माईल स्‍टोन’ ठरणारा आहे.
मुंबईत उदयोजक म्‍हणून यशस्‍वी ठरलेल्‍या अशोक जगदाळे यांनी अल्पावधीतच तुळजापूर तालुक्‍यात समाजसेवक म्‍हणून नावलौकिक मिळविला आहे. त्‍यानी समाजसेवक म्‍हणून कामगिरी करीत असताना सर्वसामान्यांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. सरकारी सेवेला रामराम ठोकून समाजकार्यामार्गे राजकारणात उतरण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेल्‍या अशोक जगदाळे यांचा जन्‍म २७ जुलै १९६६ रोजी नळदुर्ग ता. तुळजापूर येथे झाला. त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते. त्‍यांचे बालपण नळदुर्ग येथे गेले. नळदुर्ग येथील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शालेय शिक्षणानंतर ते गुलबर्गा येथील पॉलेटेक्‍नीक कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअर झाले.
त्‍यांनतर त्‍यांनी लगेचच १९८४ साली म्‍हणजे वयाच्‍या १८ व्‍या वर्षी मुंबई महापलिकेत इं‍जिनीअर म्‍हणून सरकारी सेवेत रुजू झाले आहे. त्‍यांनतर त्‍यानी नौकरी करीत असतानाचा रात्र शाळेतून डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच त्‍यांची जास्‍त काळ नोकरी न करता स्वताचा उद़योग व्‍यवसाय उभारण्याची महत्त्वाकांक्षा होती.  त्‍यांनी १९९० साली महापलिकेतील नौकरीचा राजीनामा देवून जगदाळे अॅन्‍ड असोसिएटस या छोटया फर्मची स्‍थापना केली. कोणतीही व्यावसायिक परंपरा नसताना, पैशाचे पाठबळ नसताना, केवळ जिद्द आणि  ज्ञानाच्या जोरावर  त्‍यांनी २००० साली ‘दष्‍टी इंजिनअरिंग डेव्‍हलपर्स’ या कंपनीच्‍या माध्‍यमातून बांधकाम क्षेत्रातील मोठे व्‍यावसाय करण्‍यास सुरुवात केली.

या कंपनीच्‍या माध्‍यमातून अल्‍पवाधितच अशोक जगदाळे यांचे नाव सर्वत्र झाले. २००५ साली दष्‍टी फर्ममध्‍ये त्‍याचे रुंपातर केले. तर २००७ साली त्‍यांनी दष्‍टी ग्रुपची स्‍थापना केली. आजमित्‍तीस मुंबईस राज्‍यभरातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी दष्‍टी उदयोग समुहाच्‍या माध्‍यमातून ४५० कोटी रुपयांचे प्रोजेक्‍ट सुरु आहेत. कोणतेही काम उत्तम दर्जाचे व वेळेवर करण्याचे बांधकाम शास्त्राचे अर्थशास्त्र अशोक जगदाळे यांनी अंगिकारले आहे.
त्‍यांनी सुरू केलेल्‍या विविध ठिकाणच्‍या प्रोजेक्‍टमधून काम करीत असलेल्‍या शेकडो बेरोजगारांना रोजगारांना रोजगार उपलब्‍ध झाला आहे. कित्‍येक जणांना स्‍वताच्‍या पायावर उभे करण्‍यासाठी त्‍यांनी सर्वोत्‍तपरी मदत केली. आतापर्यंत त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणच्‍या प्रोजेक्‍टवर काम करणारे हजारो युवक स्‍वावलंबी झाले आहेत. स्‍वताच्‍या पायावर उभे असलेले कित्‍येक  युवक आज अशोकभाउ मुळेच आम्‍हाला नवीन मार्ग उपलब्‍ध झाला असे सांगतात.
आपण ज्‍या मातीत वाढलो आणि मोठे झाले त्‍या समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दत हेतूने त्‍यांनी नळदूर्ग या आपल्‍या जन्‍मगावाशी नाळ जोडलेली होती. त्‍यातूनच त्‍यांनी २०१० साली नळदुर्ग शहरालगत असलेला तुळजाभवानी शेतकरी सहकार साखर कारखाना चालविण्‍यास घेतला. त्‍यांनी कारखाना चालविण्‍यास घेण्‍याअगोदर दोन वर्षांपासून हा कारखाना बंद होता. राज्‍यातील कोणताही मोठा उदयोजक हा कारखाना चालविण्‍यासाठी घेण्‍यास तयार नव्‍हता. मात्र, त्‍यानी केवळ समाजाविषयी असलेली बांधिलकी लक्षात घेवून हा कारखाना भाडेतत्‍वार सहा वर्षांसाठी चालविण्‍यास घेतला. दोन वर्ष त्‍यांनी कारखाना चालविला एक वर्ष गाळप करून परिसरातील शेतक-यांची वाहवहा मिळवली. मात्र, हा कारखाना उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचा कर्जदार असल्‍याने त्‍यांनी कारखान्‍याला जप्‍तीची नोटीस पाठविली. त्‍यामुळे कारखाना कर्जाची रक्‍कम भरत नसल्‍याने जगदाळे यांचा भाडेतत्‍ववरील करार मध्‍येच मोडण्‍यात आला. यामुळे त्‍यांना सहा कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. त्‍यानंतरही त्‍यांनी न डगमगता सामाजीक कार्य सुरुच ठेवले आहे.
त्‍यांनी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिराचा जीर्णोध्‍दार केला आहे. त्‍यासाठी त्‍यांनी मोठी देणगी मदत म्‍हणून दिली आहे. त्‍यासोबतच नळदुर्ग परिसरातील नंदगाव व अनेक गावातील मंदिर जीर्णोध्‍दरासाठी मोठी देणगी देवून समाजप्रती असलेली निष्‍ठा त्‍यांनी दाखवून दिली आहे.  त्यासोबतच जगदाळे यांनी नळदुर्ग येथे १७ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन केले होते. या विवाह सोहळयात १९ जोडप्यांचे विवाह केले. या सोहळयासाठी तालुक्यातून वीस हजारपेक्षा आधिक नागरिक जमले होते. कित्येक पेशंटना ऑपरेशनसाठी मदत म्हणून त्यांनी देणगी स्वरूपात रक्कम दिली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. महिलांचे आरोग्य सुलभ रहावे म्हणून त्यांनी काटगाव, जळ‌कोट व नळदुर्ग येथे मोफत स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन केले.
समाजसेवेची आवड निर्माण झाल्‍याने नळदुर्ग येथील युवकांची मदत घेत त्‍यांनी समाजसेवेची  चळवळ सुरूच ठेवली. समाजसेवा ही राजकारणविरहित हवी होती; पण चर्चेने फार काही साध्य होणार नाही, राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही, त्यासाठी राजकारणात उतरावे, असे ठरल्‍याने त्‍यांनी आगामी काळात राजकारणात उतरण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या या निर्णयाचे सर्वसस्‍तारातून स्‍वागत होत आहे.
आगामी काळात त्‍यांना तुळजापूर तालुक्‍याचे प्रतिनिधीत्‍व करायचे आहे. त्‍यासाठी त्‍यांनी आतापासूनच तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्‍याचे ठरविले आहे. त्‍यांनी निवडणूक लढववी म्‍हणून त्‍यांच्‍या पाठीमागे हजारो युवकांची फळी उभारली आहे. सोशल मिडीयाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या उमेदवारीला युवकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. त्‍यांनी आतापर्यंत केलेले समाजसेवेचे कार्य जनमानसांत रुजल्‍याने आागमी काळात तालुक्‍याला खंबीर नेतत्‍व मिळाल्‍याने नागरिकांत चैतन्‍याचे वातावरण आहे. आगामी काळात त्‍यांना जनतेची सेवा करायची आहे. त्‍यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दे हीच त्यांच्या वाढदिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना.  
आतापर्यंत रा‌बवलेले उपक्रम
१.बंद पडलेला कारखाना भाडेतत्वावर चालविला
२.नळदुर्ग येथील अंबाबाई देवस्थानचा जिर्णोध्दार
३.१९ जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ
४.महिलांसाठी आरोग्य शिबिर
५.समाजातील अनेक गरजुंना मदत
६.हदयरोग निदान ‌शिबिराचे आयोजन
७. सामाजीक उपक्रमासाठी मदत  
आगामी काळात रा‌बविण्यात येणारे उपक्रम
१.गुळ उदयोगाची उभारणी
२.मकापासून स्‍टार्च निर्मिती करणा-या कारखान्याची उभारणी
३.शैक्ष‌णीक संस्थाची निर्मिती
४. युवकांसाठी रोजगार उपलब्‍ध करणार
५.गरजू विद्यार्थ्यांना,पेशंटना, मदत
६. आरोग्यसंदर्भात जनजाग्रती करणार
७. सामाजीक उपक्रम राबविणार
 
Top