नळदुर्ग -   येथील आदर्श शिक्षक  वसंतराव वासूदेवाचार्य अहंकारी यांच्‍या निवासस्‍थानी दि. 6 जुलै ते 12 जुलै दरम्‍यान भगवत सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     मागील 40 वर्षापासून अखंडपणे या भगवत सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात येत आहे. 1973 पासून सुरू झालेली ही परंपरा आहे. सुरूवातीला वे.शा.सं.कै श्रीनिवासाचार्य मुरूमकर यांनी 25 वर्ष भगवत कथा सांगितली. मागील 10 वर्षापासून वे.शा.सं श्री राम जोशी (.केज जि.बीड) यांच्‍या मुखातून भगवत कथा सांगितली जात आहे. श्रीराम जोशी हे अत्‍यंत अभ्‍यासू आहे. त्‍यांना वेदशास्‍त्राचा मोठा अनुभव आहे. त्‍यांच्‍या वणीमध्‍ये गोडवा आहे. त्‍यामुळे दररोज शेकडो भाविक भगवत कथेचा लाभ घेतात. गोपाळकाला हा प्रमुख उत्‍सव असतो. गुरूपोर्णीर्मेच्‍या दिवशी याची समाप्‍ती असते. यादिवशी महाप्रसादाचा वाटप असते. अनेक गावातील भाविक प्रसादाचा लाभ घेतात.
     तरी या भगवत सप्‍ताहाचा लाभ घ्‍यावा अशी विनंती श्री बाबूराव अहंकारी, वसंत अ‍हंकरी, बळवंत अहंकारी, विकास अहंकारी, योगेश अहंकारी वैभव अहंकारी, विनायक अहंकारी, श्रीनिवास अहंकारी यांनी केली आहे.


 
Top