वैराग (महेश पन्हाळे) -: छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या फेसबुकवरील प्रतिमेचे विडंबन केल्याने वैराग (ता. बार्शी) येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तर वैरागमध्ये संपूर्ण बाजारपेठेत कडकडीतपणे बंद पाळण्यात आली होती. वैरागच्या शिवाजी चौकात शांततामय रीतीने रास्तारोको करण्यात आला .
याबाबत माहिती अशी कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फेसबुकवरील प्रतिमेच्या विडंबनाची माहिती समजताच युवकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गावातून जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, संभाजी महाराज कि जय अशा घोषणा देत विडंबन करणा-याचा निषेध केला. वैरागची बाजारपेठ व्यापा-यांनी कडकडीतपणे बंद ठेवली शिवाजी चौकात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व राजकीय पक्षांच्या वतीने विविध संघटनांच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे विष्णू तुपे, आनंद कोरके, शिवसेना तालुका उपप्रमुख कल्याण (काका) गायकवाड, बाळासाहेब पवार, शिवसेना शहर अध्यक्ष संतोष गणेचारी, दीपक आंधळकर, भाजपचे अशोक पाचभाई व वैरागचे सर्व शिवप्रेमी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी एकत्र येऊन या सर्वांच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.