कळंब :- फेसबुक पेजवर छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकुन महापुरूषाची बदनामी केल्यामुळे कळंब शहरात आज उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. दरम्यान शहरातील तणाव कायम असुन शनिवार राञीच्या घटनेनंतर रविवारी सकाऴी कळंब शहरात अज्ञात व्यक्तीनी आठ बसस आणी पाच ट्रकवर दगडफेक करुन वाहनाचे नुकसान केले. या घटनेत चौघेजण जखमी झाले आहे.
सौमुक्ता आप्पासाहेब चौरे (रा. जीवाचीवाडी, ता. केज, जि. बीड), पांडुरंग जोशी (चालक, कळंब आगार), विठ्ठल साळुंखे (रा. सोनसांगवी, ता. केज, जि. बीड), शिवाजी जगताप (चालक, कळंब आगार) असे दगडफेकीत जखमी झालेल्यांचे नाव आहेत. हिंदवी स्वराजाचे संस्थाप छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अश्लिल छायाचित्रे फेसबुकवर टाकल्याच्या घटनेचे कळंब शहरात पडसाद उमटून बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण आठ बसेसची तोडफोड करुन दगडफेक करण्यात आल्या. त्यापैकी बार्शी-कळंब व केज-कळंब या गाडीमधील चौघेजण जखमी झाले आहेत.
रविवारी सकाळी साडे आठ वाजता सर्व बसेसच्या फे-या बंद करण्यात आल्या. बाहेरुन आलेल्या बसेससुध्दा आगारात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुपारी साडे चार वाजेपर्यंत प्रवाशी खोळंबून राहिले होते. त्यांच्या नाश्ताची व्यवस्था कळंब येथील नागरिकांनी कळंब आगारात केली होती. पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. साडे चार वाजता लांब पल्याच्या गाड्या सुरु होताच पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कळंब-येरमाळा रोडवरील संत तुकोबाराय चौकात रिसोड-पंढरपूर (क्र. एम.एच 40 वाय 5124) या बसेसवर दगडफेक करण्यात आली.
फेसबुक पेजवर महापुरुषाचे बदनामी होईल असे छायाचिञ टाकुन मजकुर लिहण्याच्या घटनेचे कळंब शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत.असे कृत्य करणा-यावर कारवाई करावी यामागणीसाठी कळंब येथील शिवप्रेमी युवकानी शिवाजी चौकात शनिवारी राञी 8:30 च्या सुमारास तासभर रास्ता रोको केला होता.तसेच अज्ञात व्यक्तीनी शनिवारी राञी कळंब शहरात या तीन तर भाटशिरपुरा गावाजवळ औरंगबाद - कळंब - तेर (mh 20 b) या बसवर दगडफेक करण्यात आली होती. फेसबुक प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी राञी झालेल्या आंदोलनाची धार दुस-या दिवशी रविवारीही कमी झालेली नव्हती. रविवारी सकाळी माजलगाव कोल्हापुर (mh 20 bl 2797) ,कळंब केज ( mh 20 bl 0139), कळंब केज ( mh 20 d 9521),कळंब लातुर ( mh 20 d 9915),कळंब बार्शी ( mh 20 dl 0278),कळंब बावी ( mh 20 dl 0822) या बसवर दगडफेक करुन नुकसान करण्यात आले. याशिवाय mh 20 at 4277 या टिप्परवर,mh 44 200, mh 44 8000, mh 44 9600 या उर्जा कंपऩीच्या प्लाय अॅश वाहतुक करणा-या टॅकंरवर,हिदुस्तान पेट्रोलियमसाठी वाहतुक करणा-या mh 12 ho 4207 या टॅकंरवरही अज्ञात जमावाने दगडफेक करुन मोठे नुकसान केले आहे. यावेली तहसिलदार वैशाली पाटील याही घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या.अचानक उदभवलेल्या या आंदोलनास पोलिस निरिक्षक चंद्रकांत सावळे व कर्मचार्यानी व्यवस्थित हाताळले.
छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या विटंबनेप्रकरणी कळंब शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.. एकाही व्यापा-याने आपले दुकान उघडले नव्हते. हे कृत्य करणा-या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.