पांगरी (गणेश गोडसे) -: हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अश्लिल छायाचित्रे फेसबुकवर टाकल्याच्या घटनेचे पांगरी (ता. बार्शी) सह येडशी, येरमाळा आदी भागात तीव्र पडसाद उमटल्याचे दिसुन आले असुन येडशी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार बसेसची मोडतोड करून काचा फोडण्यात आल्या. पुण्यातील माथेफिरूने महापुरूषांच्या प्रतिमांच्या विटबनांचे हिन कृत्य केल्यामुळे शनिवारी रात्रीपासुनच पांगरीसह परिसरातील अनेक गांवामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. शिवप्रेमी तरूण शनिवारी रात्रीपासुनच गटागटाने फिरून घडलेल्या घटनेचा निषेध करत होते.
व्हॉटस अॅप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयामुळे तरूणांना झालेल्या कृत्याची माहिती उपलब्ध होत होती व तरूणही सदर माहिती पुढे पाठवुन याचा निषेध नोंदवत होते. पांगरी भागातील कारी, कुसळंब, चारे, आगळगांव, चिंचोली, पांढरी, घारी, पुरी, गोरमाळे, नारी, खामगांव, घोळवेवाडी, ढेंबरेवाडी, आदी छोटया-मोठया गावात व वाडया वस्त्यांवरही विटंबना प्रकरणाचे पडसाद उमटले होते.
आज रविवारी पांगरीचा आठवडी बाजार असतानाही बाजारावर विटंबना प्रकरणाचे तिव्र सावट दिसुन आले. शनिवारी सायंकाळी तावडी शिवारात बार्शीतील तरूणाच्या झालेल्या निघृण खुनाच्या प्रकारामुळे अगोदरच तणावपुर्ण परिस्थती निर्माण झालेल्या पांगरीत महापुरूषांच्या झालेल्या विटंबना प्रकरणाने पुन्हा तणावात भर पडली. खुन प्रकरणाचा रविवारी सकाळपर्यंत पांगरीत तणाव निर्माण झालेला होता. पांगरीतील शिवप्रेमी तरूणांनी महापुरूषांच्या झालेल्या विटंबनेचा तिव्र निषेध व्यक्त करून विटंबना केलेल्या समाजकंटकावर कठोरात कठोर कायदेशिर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना दिले. हिसंक आंदोलन करून जनतेला त्रास न देण्याचा निर्णय घेऊन पांगरीत शांततेत निषेध व्यक्त करण्यात आला.