बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील बेकायदा अथवा दोन नंबरच्या धंद्याने थैमान घातले आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पोलिसांचा कसलाही अंकुश नसल्याने होणार्या हलर्गीपणामुळे बार्शीतील नागेश गाढवे याचा खून झाला आहे.
बार्शीतील आझाद चौक येथील नागेश रामलिंग गाढवे (वय २३) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बार्शी उस्मानाबाद रोडवरील खामगाव जवळील आर्यन शुगर्स पासून एक किलोमीटर अंतरावर त्याचे प्रेत आढळून आले आहे. अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्रांनी गळ्यावर व शरीरावर गंभीर जखमा केल्याचे व रक्त सांडल्याचे दिसून आले. पांगरी पोलिसांना याबाबत खबर मिळताच एक पथक पाठवून पंचनामा करुन प्रेत ताब्यात घेतले व पांगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. बार्शी पोलिसांत मयत नागेश गाढवे यांच्यावर सन २०११ , २०१२, २०१३, २०१४ साली शरीराविषयी गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ३ गुन्हे न्यायालयीन प्रक्रियेत व एकाचा पोलिस तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी दिली.