वैराग (महेश पन्‍हाळे) :- फेब्रुवारी-मार्च 2014 मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या बारावीच्‍या परीक्षेचा निकाल सोमवार रोजी अॉनलाईन जाहीर झाला.  वैराग (ता. बार्शी) येथील तुळशीदास जाधव उच्‍च माध्‍यमिक ज्‍युनिअर कॉलेजची साधना सोमनाथ कळसाईत ही विद्यार्थिनी 84.91 टक्‍के गुण मिळवून वैराग भागात प्रथम आली आहे. या कॉलेजचा शंभर टक्‍के निकाल लागला आहे.
     वैराग (ता. बार्शी) येथील विद्यामंदीर संस्‍थेची कु. पल्‍लवी जगन्‍नाथ कापसे हिला 650 पैकी 502 गुण मिळाले असून 77.23 टक्‍के मिळवून ती प्रथम आली आहे. विद्यामंदीर प्रशालेचा 91.62 टक्‍के निकाल लागला असून 382 विद्यार्थ्‍यांपैकी 350 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले. किमान कौशल्‍य विभागाचा 95 टक्‍के तर कला विभागाचा 80 टक्‍के निकाल लागला. सुमित माकणे व रेश्‍मा लक्ष्‍मण घोलप या दोघांना 500 मार्क मिळाले. तर सुरज सिध्‍देश्‍वर कुरुंद याने 490 मार्क मिळवून  77 टक्‍के मिळाले. 
      विद्यामंदीर कन्‍या कॉलेजचा 95.70 टक्‍के निकाल लागला. 93 पैकी 89 मुली उत्‍तीर्ण झाल्‍या. पल्‍लवी कापसे 77.23 टक्‍के गुण मिळवून प्रथम, आरजू फिरोज मुजावर 77 टक्‍के गुण मिळवून दुसरी तर पुजा चंद्रकांत पाटील 74.30 टक्‍के मिळवून तिसरी आली. शास्‍त्र शाखेचा 98 टक्‍के निकाल लागला.  संस्‍थेचे अध्‍यक्ष जयंत भूमकर, सचिव अनिरुध्‍द झालटे, चेअरमन मृणाल भूमकर यांनी यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले.
          शोभाताई सोपल कनिष्‍ठ महाविद्यालयाचा 82.86 टक्‍के निकाल लागला. अनुराधा देशमुख उच्‍च माध्‍यमिकचा 96.95 टक्‍के निकाल लागला. तर शारदादेवी उच्‍च विद्यालयाचा 90.57 टक्‍के, विद्यासाधना ज्‍युनिअर कॉलेजचा 72.41 टक्‍के निकाल लागला. तसेच तुळशीदास जाधव उच्‍च महाविद्यालयाचा शंभर टक्‍के निकाल लागला आहे. साधना कुळसाईत 84.91 टक्‍के मिळवून प्रथम, अमिद काशीद 82.15 टक्‍के मिळवून द्वितीय तर पुनम शिंदे 81.69 टक्‍के मिळवून तिसरी आली. परीक्षेस 89 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले. आठ विद्यार्थी विशेष प्राविण्‍यासह प्रथम श्रेणीत तर 70 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण झाले. मदन जाधव, अभिजीत पाटील, मेघा नवले, बापू पिसाळ, योगेश कोकाटे, सुहास बुरुगुटे आदींचे विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन लाभले.
 
Top