नळदुर्ग :- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित अध्यापक विद्यालय, नळदुर्ग येथे दि. 2 जून ते 16 जून या कलावधीत डीटीएड प्रवेश अर्जाची विक्री सुरु आहे. तसेच दि. 2 ते 17 जून या कालावधीत प्रवेश अर्जाची स्विकृती होणार आहे. अध्यापक विद्यालय नळदुर्ग येथे प्रवेश अर्ज सकाळी दहा ते पाच या वेळेत उपलब्ध होतील. प्रवेश अर्जाचे शुल्क खुल्या वर्गासाठी 200 रुपये व मागासवर्गीयांसाठी 100 रुपये आहे. इयत्ता बारावीमध्ये खुल्या वर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण व मागासवर्गीयांसाठी 44.5 टक्क गुण असणे आवश्यक आहे, अशी माहिती अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अंकुशराव एस.के., प्रा. जमखंडे डी.ए. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.