उस्मानाबाद -: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय विभागा मार्फत सहायक आयुक्त समाजकल्याण, उस्मानाबाद यांचे अधिनस्त चालविण्यात येत असलेले तुळजापूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात सन 2014-15 या शैक्षणीक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रीया सुरु आहे.
शालेय विभागाच्या विद्यार्थिनीने 1 मे, 2014 पासून किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसाचे आत व महाविद्यालयीन विद्यार्थीनीने निकाल लागल्यापासून 15 दिवसाचे आत प्रवेश अर्ज प्राप्त करुन घेऊन परिपुर्ण अर्ज भरुन वसतीगृहात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन संबंधित वसतीगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
यासाठीची प्रवेश पात्रता पुढील प्रमाणे आहे. शालेय विभागासाठी इयत्ता 7 वी उत्तीर्ण व महाविद्यालय विभागासाठी इयत्ता 10 वी, इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रहिवासी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग किंवा आर्थिकदृष्टया मागासलेल्या प्रवर्गातील असावा. अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख व इतर प्रवर्गासाठी रु. 1 लाख पर्यंत असावे.