पांगरी (गणेश गोडसे) :- केंद्रिय ग्रामविकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या अपघाती दुखःद निधनाचे वृत्त वा-यासारखे पांगरीसह परिसरातील घोळवेवाडी, उक्कडगांव, वाघाचीवाडी, कारी, आगळगांव, घारी आदी गावात पोहचताच अनेकांना धक्के बसले असुन घोळवेवाडी येथे तर ग्रामस्थांनी चुलीच पेटवल्या नसुन उक्कडगांवात अक्षरक्षाः पेटलेल्या चुलीत पाणी ओतुन गोपिनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सर्वसामान्य व बहुजन समाजाचा नेता अशी ओळख निर्माण केलेल्या गोपिनाथ मुंडे यांचा पांगरी शेजारील उक्कडगांवशी सलोख्याचे व नात्याचे संबंध होते. गोपिनाथ मुंडे हे उक्कडगांवात सतत येत असायचे. घोळवेवाडी व उक्कडगांवातील जनतेशी त्यांचे सलोख्यांचे संबंध होते. घोळवेवाडीत त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून शोक व्यक्त करण्यात आला तसेच गावात शोकसभेचेही आयोजन करण्यात आले. यावेळी घोळवेवाडीचे सरपंच माणिक तोगे, माजी सरपंच हनुमंत घोळवे, विष्णु घोळवे, चंद्रकांत घोळवे, उमेश घोळवे, अजय घोळवे, सतिश घोळवे यांच्यासह भगवानबाबा मित्रमंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी झोपेतुन उठल्या उठल्या लोकांना गोपिनाथ मुंडे या लोकनेत्यांचा दिल्लीत अपघात झाल्याच्या वृत्ताने अनेकांना धक्का दिला. प्रत्येकजण निधनाच्या वृत्ताची खातरजमा करत होते. अनेकांना या वृत्तात खरेपणा नसल्यासारखेच वाटत होते. तर या भागातुन जे कार्यकर्ते आज त्यांच्या बिड येथे होणा-या नागरी सत्काराला उपस्थित राहण्यासाठी जाणार होते त्यांना तर आपले अश्रुच अडवता आले नाहीत. अपघाताचे वृत्त समजताच उक्कडगावात पेटलेल्या चुलीत महिलावर्गांनी पाणी ओतुन चुली बंद केल्या. दरम्यान लगेच मुंडे यांचे निधन झाल्याचे वृत्त धडकताच लोकांना अश्रू आवरता आले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी गावाला दिलेल्या भेटीतील जुन्या प्रसंगाला प्रत्येकजण उजाळा देऊन शोक व्यक्त केला जात होता. जनता गटागटाने बसुन शोक व्यक्त करताना दिसत होते. त्यांचे सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळयांचे संबंध असल्यामुळे तळागाळातील जनतेमधुन तीव्र शब्दात शोक व्यक्त केला जात आहे. गोपिनाथ मुंडे यांचा लवकरच पांगरी जवळील कारी या गावात जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले हेते. पांगरी परिसरातील लोक ग्रामविकास मंत्रीपद स्विकारलेल्या गोपिनाथ मुंडे यांना पाहण्यासाठी डोळे लावुन बसलेले असतानाच अचानक त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पांगरी परिसरावर शोककळा पसरली आहे.