उस्मानाबाद -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, उस्मानाबादच्या वतीने 26 जुन रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.
    सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास खासदार रविंद्र गायकवाड, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, आमदार दिलीपराव देशमुख, आ.ओमराजे निंबाळकर,आ. राहूल मोटे, आ.विक्रम काळे, आ.ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष रेविता बनसोडे, समाज कल्याण सभापती दगडु धावारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्यासह  आदि उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याणचे शेंदारकर ए एम, जि.प.चे समाजकल्याण अधिकारी एस के मिनगिरे यांनी केले आहे.
 
Top