उस्मानाबाद :- केंद्रातील एनडीए सरकारने रेल्‍वेची केलेल्‍या दरवाढी विरोधात उस्‍मानाबाद जिल्‍हा कॉंग्रेस कमिटीच्‍यावतीने येथील रेल्‍वे स्‍थानकावर दि. 25 जून रोजी रेल रोको आंदोलन करण्‍यात आले.
    यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि. प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, लक्ष्मण सरडे, समियोद्दीन मशायक, राजलक्ष्मी गायकवाड, विलास शाळू, सिद्धार्थ बनसोडे, दत्ता सोनटक्के, प्रथमेश पेंढारकर, दर्शन कोळगे, इक्बाल हुसेन, महेबुब पटेल, दिलीप भालेराव, बिभीषण खामकर, सुधाकर गुंड, संजय घोगरे, धिरज पाटील, काशिनाथ बंडगर, दिपक जवळगे, नळदुर्गचे नगराध्‍यक्ष शहबाज काझी, त्र्यंबक शेळके, प्रकाश चव्हाण, रामकृष्ण खरोसेकर, शिला उंबरे, नवाज काझी, विजयकुमार सोनवणे, उमेश राजे, धनंजय राऊत, सुरेश शेरखाने, यांच्‍यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    केंद्र सरकारने प्रवासी भाडे १४.०२ टक्के तर माल वाहतुक दरवाढ ६५ टक्के केल्यामुळे सर्व सामान्य लोकांना प्रवाशांचे असणारे एकमेव साधन म्हणजे रेल्वे आहे. भाड्याची भरमसाठी वाढ केल्यामुळे देशातील जनतेला अच्छे दिन आयेंगे म्हणणा-या मोदी सरकारने फसविले असुन भाववाढ रोख, महागाई थांबवू म्हणणा-या सरकारने त्यांचे खरे रूप दाखविण्यास सुरूवात केली आहे.
    रेल्वे दरवाढी पाठोपाठ गॅस, पेट्रोल, डिझेल, साखर व इतर वस्तुंचे ही भाववाढ करण्याकडे सरकारचा कल दिसत आहे. काँग्रेस पक्षाने रेल्वे दरवाढीची दखल घेऊन सरकारला दरवाढ रद्द करावी असा इशारा आज रेल रोको आंदोलन करून दिला आहे. आजच्या आंदोलनाने सरकारने भानावर यावे व दरवाढ रद्द करावी अन्यथा यापुढे या प्रश्नावर रस्त्यावर उतरूण तिव्र आंदोलन करू अशा सुचना वजा इशारा दिला आहे.
 
Top